रोजचं रनिंग इंटरेस्टिंग करण्यासाठी सोप्या टीप्स, रोज म्हणाल, 'भाग मिल्खा भाग'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:02 PM2021-06-28T19:02:39+5:302021-06-28T19:03:16+5:30

रोज धावण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का? असल्यास आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आणखी उत्साहाने धावण्याची इच्छा होईल.

Simple tips to make everyday running interesting, say everyday, 'Bhaag Milkha Bhaag' | रोजचं रनिंग इंटरेस्टिंग करण्यासाठी सोप्या टीप्स, रोज म्हणाल, 'भाग मिल्खा भाग'

रोजचं रनिंग इंटरेस्टिंग करण्यासाठी सोप्या टीप्स, रोज म्हणाल, 'भाग मिल्खा भाग'

Next

आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आपण आपल्याला जे जमेल ते केले पाहिजे. मग त्यासाठी आपण रोज सकाळी धावायला गेलो तर ते अति उत्तम. तुमच्यापैकी बरेचजण सकाळी धावत असतील. पण रोज धावण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का? असल्यास आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आणखी उत्साहाने धावण्याची इच्छा होईल.
रस्ता बदला
रोज धावण्याचा तुमचा रस्ता ठरलेला असेल. जी रोजची वाट असेल तर तुम्ही त्यावरच नियमित धावत असाल. आता धावण्याचा रस्ता बदला. एखादे वेगळे ठिकाण निवडा. तिथे धावायला सुरुवात करा. बघा धावणं अधिक इंट्रेस्टिंग होईल.
घडाळ्याकडे बघणं विसरा
तुम्ही घड्याळ लावून सतत धावत असाल तर ते आता करू नका. त्याएवजी तुम्हाला वाटेल तितकावेळ मनसोक्त धावा. घड्याळ लावून धावण्यामध्ये असा तोटा आहे की तुम्ही सतत त्या दडपणाखाली धावता. त्यामुळे धावण्याची मजा निघून जाते.


वॉर्मअप करा
तुम्ही लगेच धावायला सुरुवात करू नका. धावण्याआधी तुम्ही ५-१० मिनिट वॉर्म अप करा. बॉडी गरम व्हायला वेळ लागतो. वॉर्मअप केल्याने बॉडी हळूहळू गरम व्हायला लागते आणि तुम्हाला उर्जावान वाटते.
धावण्याआधी लक्ष्य निश्चित करा
धावणं सुरु करण्याआधी तुम्ही कशासाठी धावत आहात हे लक्ष्य सुनिश्चित केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला धावण्याची प्रेरणा मिळेल. लक्ष्य नक्की केल्याने तुम्हाला बोरिंग वाटणार नाही.
कॉफी प्या
धावण्याच्या तीस मिनिटं आधी कॉफी प्या. कॉफी प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते. तुमचा स्टॅमिना वाढतो. तुमचा पर्फॉर्नमन्सही सुधारतो.

Web Title: Simple tips to make everyday running interesting, say everyday, 'Bhaag Milkha Bhaag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.