Hair loss: एन पंचवीशीतच टक्कल पडण्याची समस्या तुमचं तारुण्य हिरावून घेतेय, वेळीच करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:27 PM2022-09-07T12:27:47+5:302022-09-07T12:30:34+5:30

आम्ही अशा काही साध्या साध्या गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचे तुम्ही व्यवस्थित आचरण केल्यास तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही.

simple tips to prevent hair loss in men | Hair loss: एन पंचवीशीतच टक्कल पडण्याची समस्या तुमचं तारुण्य हिरावून घेतेय, वेळीच करा हे उपाय

Hair loss: एन पंचवीशीतच टक्कल पडण्याची समस्या तुमचं तारुण्य हिरावून घेतेय, वेळीच करा हे उपाय

googlenewsNext

केस गाळण्याची समस्या सर्वांमध्ये सामान्य आहे. पुरुषांचे केस साधारणपणे 20 ते 25 वर्षे वयोगटात गळायला लागतात. काहीवेळा पुरुषांना विसाव्या वर्षीच टक्कल पडते. याची खूप वेगवेगळी कारणं अनुवांशिकता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि काहीवेळा एंड्रोजेन नावाचे सेक्स हार्मोनदेखील पुरुषांच्या टक्कल पडण्याशी निगडित आहे. आम्ही अशा काही साध्या साध्या गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचे तुम्ही व्यवस्थित आचरण केल्यास तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही.

केसांसाठी माईल्ड शाम्पू वापरा
E Times ने दिलेल्या माहितीनुसार, नियमित केस धुणे हा केस गळती रोखण्याचा एक भाग आहे. केस आणि स्कॅल्प स्वच्छ असल्यास केसांमध्ये इन्फेक्शन आणि कोंडा होण्याचा धोका कमी होतो. मात्र त्यासाठी केस धुताना माईल्ड शॅम्पूचाच वापर करा. यामुळे केसांना जास्त हानी होत नाही.

आवश्यक व्हिटॅमिन्स
व्हिटॅमिन्स केवळ एकंदर आरोग्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही चांगली असतात. व्हिटॅमिन ए स्कॅल्पमध्ये सेबमच्या निरोगी उत्पादनास प्रोत्साहन देते, व्हिटॅमिन ई स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण चांगले करते आणि व्हिटॅमिन बी केसांना निरोगी रंग राखण्यास मदत करते.

प्रोटीनयुक्त आहार घ्या
सोया किंवा इतर प्रोटीन खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते आणि केस गळतीला आळा घालण्यास मदत होते. त्याचबरोबर अल्कोहोलयुक्त पेये आणि धूम्रपान करणे टाळा, शारीरिक ऍक्टिव्हिटी टाळा, तणावमुक्त राहा, केसांमध्ये घाम येऊ देऊ नका.

स्कॅल्पवर ऑइल मसाज करा
ज्यांना काही काळापासून केसगळतीचा अनुभव येत आहे त्यांनी काही मिनिटांसाठी तेलाने टाळूची मालिश करावी. हे तुमचे केस follicles सक्रिय राहण्यास मदत करते. तुम्ही बदाम किंवा तिळाच्या तेलात लॅव्हेंडर घालू शकता.

ओले केस विंचरू नका
जेव्हा केस ओले असतात तेव्हा ते सर्वात कमकुवत अवस्थेत असतात. त्यामुळे ओले केस घासणे टाळा कारण केस गळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ओले केस विंचरू नका.

शरीर हायड्रेटेड ठेवा
केसांच्या शाफ्टमध्ये एक चतुर्थांश पाणी असते. त्यामुळे हायड्रेटेड राहण्यासाठी आणि निरोगी केसांच्या वाढीसाठी दिवसभरात किमान चार ते आठ कप पाणी प्या.

Web Title: simple tips to prevent hair loss in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.