'या' लोकप्रिय गायिकेच्या वडिलांना ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 04:42 PM2019-10-03T16:42:50+5:302019-10-03T16:49:41+5:30

Breast Cancer : आतापर्यंत आपणं महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे ऐकले असेल, पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहीत नाही की, पुरूषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो. एका प्रसिद्ध गायिकेचे वडिल ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असून त्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.

Singer beyonce knowles father mathew reveals about his breast cancer know the symptoms | 'या' लोकप्रिय गायिकेच्या वडिलांना ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

'या' लोकप्रिय गायिकेच्या वडिलांना ब्रेस्ट कॅन्सर; जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Next

(Image Credit : Medscape)

आतापर्यंत आपणं महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे ऐकले असेल, पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहीत नाही की, पुरूषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो. एका प्रसिद्ध गायिकेचे वडिल ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असून त्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महिला आणि पुरूष दोघांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. तसेच या दोघांमध्येही दिसून येणारी लक्षणं वेगवेगळी असतात. 

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका बियॉन्से नोल्सचे वडिल मॅथ्यू नोल्स यांनी सांगितले की, ते स्वतः ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत आहे. त्यांनी हा खुलासा एक प्रसिद्ध टिव्हीशो 'गुड मॉर्निंग अमेरिका'मध्ये हा धक्कादायक खुलासा केला. हा एपिसोड अद्याप ऑनएअर गेला नाही. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, शर्टवर रक्ताचे डाग लागल्यानंतर त्यांनी मेमोग्राफी टेस्ट केली त्यामध्येच ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले. अनेकांना असं वाटतं की, ब्रेस्ट कॅन्सर फक्त महिलांनाच होतो पण फार कमी लोकांना असं वाटतं की, ब्रेस्ट कॅन्सर पुरूषांनाही होतो. पण पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची प्रकरणं फार कमी आढळून येतात. जाणून घेऊया पुरूषांच्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती... 

महिला आणि पुरूषांचा ब्रेस्ट कॅन्सर असतो वेगळा

महिला आणि पुरूषांना होणारा ब्रेस्ट कॅन्सर वेगवेगळा असतो. पुरूषांचे ब्रेस्ट टिश्यू महिलांच्या तुलनेमध्ये कमी असतात. तसेच त्यांची लक्षणंही वेगवेगळी असतात. पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं कारण फॅमिली हिस्ट्री, मद्यसेवन, अनुवांशिक, तंबाखू, कमी अॅक्टिव्ह राहणं यांसरखी असू शकतात. 

तपासून पाहा ही लक्षणं... 

महिला आणि पुरूष दोघांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरचं सर्वात पहिलं लक्षणं म्हणजे, ब्रेस्टवर येणारी गाठ. पुरूष नेहमी या गोष्टी इग्नोर करतात. सर्वात मोठं कराण असतं ही गाठ आल्यानंर कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत. हलकी सूज येते. त्यामुळे अनेकजण याकडे दुर्लक्षं करतात. 

(Image Credit : www.cigna.com.hk)

दबलेले निपल्स 

इनवर्टेड किंवा दबलेले निपल्स हेदेखील ब्रेस्ट कॅन्सरची निशाणी आहे. अनेकदा निपल्सच्या आजूबाजूची त्वचा फार ड्राय दिसून येते. 

डिस्चार्ज

जर तुम्हाला शर्टच्या चेस्ट एरियामध्ये डाग दिसून आला तर वेळीच सावध व्हा. कॅन्सर ट्यूमरमधून ब्रेस्टमध्ये फ्लूड जमा होतं आणि ते निपल्समधून बाहेर पडतं. 

जखम 

निपलवर जर एखादी जखम दिसत असेल तर लगेच अॅक्शन घेऊ शकता. हे त्वचेवरील ट्यूमर वाढण्याचं लक्षण आहे. पुरूषांमध्ये ब्रेस्ट टिश्यूज अजिबात नसतात. त्यामुळे ट्यूमर स्किनमार्फत बाहेर येऊ शकतो. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Singer beyonce knowles father mathew reveals about his breast cancer know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.