​‘सीताफळ’ आहे गुणकारी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2016 04:41 PM2016-11-04T16:41:18+5:302016-11-04T18:22:52+5:30

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात...

'Sitaphal' is curative ...! | ​‘सीताफळ’ आहे गुणकारी...!

​‘सीताफळ’ आहे गुणकारी...!

googlenewsNext
सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात...

डोळ्यांसाठी लाभदायक- सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे.  यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम होते.

पचनशक्ती वाढते- यात तांबे आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते. सोबतच फायबरमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. 

हृदयास सुदृढ ठेवते- यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ब्लड-कोलेस्ट्रोलला कमी करतात त्यामुळे हृदय सुदृढ राहण्यास मदत होते. 

थकवा दूर घालवितो- या फळातील गुणकारी तत्त्वांमुळे ऊर्जा मिळून आपला थकवा मिनिटातच दूर होतो. 

गर्भवती महिलांसाठी लाभदायक- गर्भावस्थादरम्यान होणारा मूड स्विंग, मॉर्निंग सिकनेस आणि आळस अशा समस्या सीताफळ खाल्ल्याने दूर होतात.  

सीताफळसोबतच त्याच्या बियांचेही अनेक फायदे आहेत. या बियांमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यातच कॅन्सर आणि डायबेटिस सारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. सीताफळाच्या बियांमध्ये नैसर्गिक अ‍ॅन्टी आॅक्सिडेंट आहे शिवाय विटॅमिन-सी भरपूर प्रमाणात आहे. यामुळे आपल्या शरीरातील इम्यून सिस्टमला मजबूती मिळते. सोबतच उर्जेचा मोठा स्त्रोत आहे. यात विटॅमिन-बी देखील आहे. या बियांपासून रक्ताची कमी म्हणजेच एनीमियापासून मुक्ती मिळते. बियांमध्ये असलेले मॅग्निशियम शरीरातील पाणी संतुलित ठेवते तसेच ब्लड पे्रशरमध्ये अचानक होणाºया बदलाला नियंत्रित करतो. सोबतच साखरेची मात्रादेखील कंट्रोल करतो. 

Web Title: 'Sitaphal' is curative ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.