सतत बसून काम केल्याने पायांना होईल ही गंभीर समस्या, डॉक्टरांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:00 AM2023-12-12T10:00:21+5:302023-12-12T10:00:47+5:30

जर तुम्ही खुर्चीवर बसून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तासंतास काम करत असाल तर याने केवळ डोळेच नाही तर वजन आणि पायांचीही काळजी घेतली पाहिजे.

Sitting jobs can damage legs and cause varicose veins know how to make legs strong | सतत बसून काम केल्याने पायांना होईल ही गंभीर समस्या, डॉक्टरांनी सांगितले उपाय

सतत बसून काम केल्याने पायांना होईल ही गंभीर समस्या, डॉक्टरांनी सांगितले उपाय

ऑफिस किंवा घरी लॅपटॉप वा कॉम्प्युटरचा तासंतास वापर केल्याने अनेक साइड इफेक्ट्स बघायला मिळतात. या सवयीमुळे तुमची डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते आणि लाइफस्टाईल सुस्त होऊ लागते. याच कारणाने तुमचे पायही खराब होऊ शकतात. चला जाणून घेऊ डॉक्टर याबाबत काय म्हणाले.

गुरुग्रामच्या मेदांतामध्ये वस्कुलर सर्जरीचे चेअरमन डॉ. राजीव पारख यांनी सल्ला दिला की, जर तुम्ही खुर्चीवर बसून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तासंतास काम करत असाल तर याने केवळ डोळेच नाही तर वजन आणि पायांचीही काळजी घेतली पाहिजे. कारण पाय तुमचं वजन दिवसभर उचलतात आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे.

पाय लटकवून ठेवण्याचे नुकसान

डॉ. राजीव पारख यांना पाय जास्त वेळ लटकवून ठेवण्याचे नुकसान सांगितले आहेत.

- ब्लड सर्कुलेशन स्लो होतं

- पायांमध्ये रक्त भरणं सुरू होतं, ज्यामुळे पायांवर सूज येते

- पायांमध्ये वेदना आणि जडपणा वाटू लागतो

- रक्ताने भरलेल्या निळ्या निळ्या नसा तयार होता, ज्यांना वेरीकोज व्हेन्स म्हणतात.

- पायांवर जखमाही होतात

यापासून वाचण्याचे उपाय

- बसून असल्यावर पाय हलवत आणि काही काही वेळाने चालत रहा

- जागा मिळाली तर पाय लांब करा

- संधी मिळाल्यावर खुर्चीवरून उठून चाला आणि स्ट्रेचिंग करा

- पाय जास्त वेळ हवेत लटकवून ठेवू नका

वजनही कमी करा

जेव्हा लोक डेस्क जॉब करतात तेव्हा त्यांना पोट बाहेर येण्याचा धोका जास्त असतो. जेव्हा तुम्ही पायांची काळजी घेण्यासाठी कामाच्या मधून चालता किंवा स्ट्रेचिंग करता तेव्हा कॅलरी बर्न होतात. याने वजन कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
 

Web Title: Sitting jobs can damage legs and cause varicose veins know how to make legs strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.