जमिनीवर बसुन जेवण्याचे आहेत भरपूर फायदे, इतके की म्हणाल ही भारतीय पद्धतच सर्वात बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:27 PM2022-05-31T13:27:27+5:302022-05-31T13:27:37+5:30

खाली मांडी घालुन बसण्याचे काय फायदे आहेत ते आपल्या पुर्वजांनी आपल्याला सांगितले आहेत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही आहेत. ही कारणे काय आहेत? जमिनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे काय हे जाणून घेऊ. 

sitting on floor for supper is extremely beneficial for health | जमिनीवर बसुन जेवण्याचे आहेत भरपूर फायदे, इतके की म्हणाल ही भारतीय पद्धतच सर्वात बेस्ट

जमिनीवर बसुन जेवण्याचे आहेत भरपूर फायदे, इतके की म्हणाल ही भारतीय पद्धतच सर्वात बेस्ट

googlenewsNext

वजन वाढणे शरीरातील आजार यासाठी आपली जीवनशैली कारणीभुत असते. आपल्या जीवनशैलीत वेगवेगळ्या सवयींचा समावेश असतो. आपण रोज कसे जेवतो म्हणजे खाली बसुन की खुर्चीवर बसुन. खाली मांडी घालुन बसण्याचे काय फायदे आहेत ते आपल्या पुर्वजांनी आपल्याला सांगितले आहेत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही आहेत. ही कारणे काय आहेत? जमिनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे काय हे जाणून घेऊ. 

वजनावर नियंत्रण राहते
खाली बसून जेवण करताना आपले शरीर सरळ राहते. त्यामुळे जेवण व्यवस्थित शरीरात जाऊन शरीरातील विभिन्न अंगांपर्यंत पोहोचते. खाली मांडी घालुन आपण जेवायला बसतो, तेव्हा आपले मन शांत राहते. आपण शरीराला गरज आहे तेवढेच जेवतो. त्यामुळे आपले वजन वाढत नाही. 

रक्ताभिसरण वाढते
जमिनीवर बसुन जेवण केल्याने रक्ताभिसरण उत्तम होते. डोकं ते पायापर्यंत रक्ताभिसरण व्यवस्थित होते. कारण खाली बसुन भोजन केल्याने रक्तवाहिन्या अधिक कार्यक्षम होतात. याऊलट खुर्चीवर बसुन भोजन केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही.

अ‍ॅसिडीटीचा त्रास होत नाही
खाली मांडी घालुन जेवायला बसल्याने अपचनाची समस्या निर्माण होत नाही. अन्नाचे व्यवस्थित पचन होते. त्यासोबतच हाडं मजबुत होतात. सांधेदुखीवर आराम मिळतो. जर तुम्ही सकाळी व रात्री जमिनीवर मांडी घालुन बसुन जेवण केले तर तुमच्या गुडघ्यांचा व्यायाम होतो. शरीराला जास्त वजन पेलण्याची सवय होते.

Web Title: sitting on floor for supper is extremely beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.