जास्त चहा प्यायल्याने हाडांना होऊ शकतो स्केलेटल फ्लोरोसिस, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:14 AM2018-10-25T10:14:22+5:302018-10-25T10:15:02+5:30

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, कोणतीही गोष्ट अति झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

Skeletal fluorosis bone disease arthritis diseases | जास्त चहा प्यायल्याने हाडांना होऊ शकतो स्केलेटल फ्लोरोसिस, जाणून घ्या कारण!

जास्त चहा प्यायल्याने हाडांना होऊ शकतो स्केलेटल फ्लोरोसिस, जाणून घ्या कारण!

googlenewsNext

(Image Credit : Foodviva.com)

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, कोणतीही गोष्ट अति झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. जर प्रत्येक अर्ध्या तासात चहा घेण्याची तुम्हाला सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. तज्ज्ञांनुसार, अनेक वर्षांपासून तुम्ही जर रोज सकाळी एकापेक्षा जास्त कप चहा घेणे तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरु शकतं. अनेकांना चहाची सवय असते, काही लोक हे दिवसातून ४ ते ५ कप चहा घेतात तर काही लोक हे दिवसातून १० ते १२ कप चहा घेतात. 

चहाने तुम्हाला फ्रेश वाटतं हे जरी खरं असलं तरी जास्त प्रमाणात चहा घेण्याचे अनेक तोटेही आहे. जास्त चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच भूक घालवण्यासाठी, रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यावर लगेच चहा घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. 

हाडांचं आरोग्य आणि चहा

आपला आहार आपल्या शरीराला पोषण देतो पण जे असंतुलित खाद्य आपण शरीरात पोहोचवतो. त्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. हे नुकसान त्वरित किंवा फार उशिरा समोर येणारे आणि त्रासदायक असू शकतात. 

चहामुळे हाडांना होणारं नुकसान फार उशिरा समोर येऊ शकतं आणि याची काळजी न घेतल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खासकरुन चहामध्ये असलेल्या फ्लोराइड नावाच्या खनिजामुळे हाडांना धोका होऊ शकतो. फ्लोराइडचं खूप जास्त प्रमाण हाडांमध्ये स्केलेटल फ्लोरोसिस होण्याचा धोका वाढवू शकतं. 

आर्थरायटिससारखा दिसणारा हा आजार हाडांमध्ये वेदना निर्माण करतो. यात कंबर, हात-पाय किंवा जॉईंट्समध्ये वेदना होऊ शकतात. एक खनिज असल्या कारणाने फ्लोराइडचं सामान्य प्रमाण दातांसाठी फायदेशीर असतं आणि पण याचं प्रमाण जास्त झालं तर नुकसान होतं. 

काय करा उपाय?

- चहा घेण्याचं प्रमाण कमी करा.

- सामान्य चहाऐवजी ग्रीन टी, हर्बल चहा घ्या.

- जेवणानंतर लगेच किंवा आधी आणि रिकाम्या पोटी चहा घेणे टाळा

- चहा घेतल्यावर गुरळा करा

- चहाची इच्छा झाली तर त्याऐवजी छाछ, नारळ पाणी इत्यादी घेऊ शकता. 
 

Web Title: Skeletal fluorosis bone disease arthritis diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.