या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, समस्या दूर करण्यासाठी काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 05:54 PM2022-08-25T17:54:09+5:302022-08-25T17:55:18+5:30

Skin Care : सुरकुत्या येण्याची काही कारणे आपण पाहुयात. ब्युटी एक्स्पर्ट जेनेट फर्नांडिस यांनी आपल्या अशा काही चुका सांगितल्या ज्यामुळे आपण काहीसे वयस्कर दिसतो.

Skin Care Tips : Habits are responsible wrinkles and fine lines | या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, समस्या दूर करण्यासाठी काय करावं?

या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, समस्या दूर करण्यासाठी काय करावं?

googlenewsNext

Skin Care : अनेकांना चेहऱ्यावरील सुरकूत्यांचा मोठा सामना करावा लागतो. काहींना कमी वयातच सुरकुत्या येतात. पण सुरकुत्या का येतात? हे अनेकांना माहीत नसतं आणि मग त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. पण सुरकुत्या येण्याची काही कारणे आपण पाहुयात. ब्युटी एक्स्पर्ट जेनेट फर्नांडिस यांनी आपल्या अशा काही चुका सांगितल्या ज्यामुळे आपण काहीसे वयस्कर दिसतो.

1) मेकअप न काढता झोपणे 

तुमची ही सवय सुरकुत्या येण्यास कारणीभूत ठरू शकते. मेकअप आणि प्रदूषणामुळे त्वचेतील elastin आणि collagen कमी होतात. त्यामुळे सुरकुत्या येतात.

2) चुकीच्या पद्धतीने मसाज करणे

त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा लोशन लावताना गोलाकार मसाज करताना आतल्या बाजूला (inwards) व खालच्या दिशेने मसाज करू नका. तर बाहेरच्या (Outwards) दिशेने मसाज करणे योग्य ठरेल.

3) पिंपल्स फोडणे

पिंपल्स फोडल्याने त्वचेचे नुकसान होऊन त्वचेवर व्रण राहतात आणि त्यामुळे सुरकुत्या ही येऊ शकतात. म्हणून पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक प्रॉडक्ट्सचा वापर करा.

4) सनस्क्रीन न लावणे

उन्हामध्ये काही वेळ राहिल्याने collagen कमी होऊन त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स येऊ शकतात. 

5) मेकअप करताना त्वचेची ओढताण करणे

ही अजून एक सवय ज्यामुळे सुरकुत्या येतात. म्हणून लिपस्टिक लावताना तोंडाचा भाग स्ट्रेच करणे, मस्कारा लावताना भुवई वर करणे. यामुळेही सुरकुत्या येतात.

Web Title: Skin Care Tips : Habits are responsible wrinkles and fine lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.