ब्लड शुगर कंट्रोल करण्याबाबत लोकांमध्ये आहे 'हा' मोठा गैरसमज, वेळीच व्हा सावध!  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:38 AM2019-10-17T11:38:04+5:302019-10-17T11:42:57+5:30

टाइप २ डायबिटीसने जगभरातील लोक पीडित आहेत आणि हा डायबिटीस अधिक धोकादायक असतो. पण जर योग्य खाणं-पिणं आणि एक्सरसाइज रुटीन फॉलो केली गेली तर हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

Skipping meals increases blood sugar and also increases the risk of type two diabetes | ब्लड शुगर कंट्रोल करण्याबाबत लोकांमध्ये आहे 'हा' मोठा गैरसमज, वेळीच व्हा सावध!  

ब्लड शुगर कंट्रोल करण्याबाबत लोकांमध्ये आहे 'हा' मोठा गैरसमज, वेळीच व्हा सावध!  

googlenewsNext

(Image Credit : Social Media)

टाइप २ डायबिटीसने जगभरातील लोक पीडित आहेत आणि हा डायबिटीस अधिक धोकादायक असतो. पण जर योग्य खाणं-पिणं आणि एक्सरसाइज रुटीन फॉलो केली गेली तर हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. अनेकदा लोकांना असं वाटतं की, जेवणामुळेच त्यांचं ब्लड शुगर वाढतंय आणि असा विचार करूनच अनेकजण त्यांचं जेवण सतत स्किप करू लागतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करून त्यांचं ब्लड शुगर कमी नाही तर अधिक वाढतं. त्यासाठी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की,  पुन्हा पुन्हा जेवण स्किप केल्याने याचा तुमच्या टाइप २ डायबिटीसवर काय प्रभाव पडतो.

जेवण स्किप करून ब्लड शुगर कमी करणं गैरसमज

टाइम्स नाऊने दिलेल्या एका वृत्तानुसार, डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी इंटरनेटवर एक नाही तर अनेक उपाय दिलेले आहेत. डायबिटीस स्वत:हून कसा कंट्रोल करता येईल याचे अनेक परिणामही बघायला मिळतात. यातील एक असतो जेवण स्किप करणं. डायबिटीसबाबत अनेक गैरसमज इंटरनेटवर आहेत. पण यातील तथ्य समजून घेऊन हे गैरसमज दूर केले पाहिजे. या गैरसमजामुळे लोक जेवण स्किप करतात. त्यांना वाटतं असं केल्याने ब्लड शुगर कमी होईल, पण अजिबात होत नसतं.

जेवण स्किप करणं हा डायबिटीस कंट्रोल करण्याचा योग्य पर्याय नाही. तुम्हाला डायबिटीस असो ना नसो तुम्ही जेवण स्किप केल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. असं करून तुम्ही कमजोरी, थकवा आणि अल्पपोषणचे शिकार होऊ लागता. इतकेच नाही तर काही आजारांचाही धोका वाढतो. 

जेवण न केल्याने लिव्हर जास्त शुगर रिलीज करतं

जेव्हा तुमचं शरीर उपवासाच्या मोडमध्ये असतं तेव्हा झोपेमुळे किंवा तुम्ही काहीच खात नसल्या कारणाने शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. ही कमतरता शरीर लिव्हर द्वारे रिलीज होणाऱ्या ग्लूकोजने पूर्ण केली जाते. टाइप २ डायबिटीसमध्ये जेव्हा तुम्ही असा विचार करून जेवण बंद करता की, ब्लड शुगर कमी होईल, तेव्हा लिव्हर ग्लूकोज जास्त रिलीज करतं. लिव्हर जेवण न केल्यावर दुप्पट ग्लूलोज रिलीज करतं.

हायपोग्लायसीमियाचा धोका

डायबिटीसमध्ये औषधासोबतच तुम्ही जर जेवण स्किप केलं तर याने कंबाइंड ब्लडमध्ये शुगरचं असंतुलन होऊ शकतं आणि हायपोग्लासीमिया किंवा लो ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. डायबिटीससाठी औषधांमध्ये इन्सुलिन शॉट्स, पंपचा समावेश असतो. याने शरीराव्दारे निर्मित केलेलं इन्सुलिनचं उत्पादन आणि उपयोग उत्तेजित केलं जातं. या औषधांमुळे ब्लड शुगरचं प्रमाण सामान्य होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण स्किप करता तेव्हा तुमच्या ब्लड शुगरचं प्रमाण फार कमी होतं. 

जेवण पूर्णपणे स्किप केल्यानंतरही तुमचं ब्लड शुगर कमी होणार नाही. तुमचं ब्लड शुगर योग्य आहाराने आणि हेल्दी फूडने कमी होऊ शकतं. तेच जर तुम्हाला ओव्हरइटिंगची सवय नसेल तर आपोआप तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहील. 


Web Title: Skipping meals increases blood sugar and also increases the risk of type two diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.