हृदयरोग आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी किती झोप पुरेशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:24 AM2018-10-10T10:24:06+5:302018-10-10T10:25:39+5:30
पुरेशी झोप घेणे हे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका ताज्या अभ्यासानुसार, गेल्या ५० वर्षात आपल्या सरासरी झोपेत दीड तासांची कमतरता आली आहे.
पुरेशी झोप घेणे हे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका ताज्या अभ्यासानुसार, गेल्या ५० वर्षात आपल्या सरासरी झोपेत दीड तासांची कमतरता आली आहे. शरीराला आवश्यक तेवढी झोप न घेतल्यास हृदय वेळेआधीच कमजोर होतं.
झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीजचा धोका
लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, जयपूरच्या नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अभ्यासात आढळून आले की, पुरेशी झोप न घेणे, नियमीत व्यायाम न करणे, डायबिटीज, धुम्रपान आणि हाय ब्लड प्रेशर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. यातही कमी झोप घेणे हे सर्वात घातक मानन्यात आलं आहे.
हृदय रोग तज्ज्ञ डॉ. निखील चौधरी यांच्यानुसार, या अभ्यास आढळून आलं की, दररोज सात तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांच्या हृदयाला अधिक धोका असतो. म्हणजे त्यांच्यात कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका असतो.
डॉ. चौधरी म्हणाले की, बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीमुळे पुरेशी झोप न घेणे आपल्या हृदयाला आणि शरीराला वृद्ध करत आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन महिन्यात ५७६ लोकांवर अभ्यास करण्यात आला. त्यात आढळून आले की, अर्ध्यापेक्षा अधिक लोकांचं हृदय त्यांच्या वयापेक्षाही १० ते ३३ वर्ष वृद्ध झालं आहे.
डॉ.चौधरी यांनी सांगितले की, निरोगी हृदयासाठी पुरेशी आणि चांगली झोप फार महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेचा अर्थ गार झोप. ही झोप इतकी गाढ असावी की, मोबाईलची बॅटरी, व्हॉट्सअॅपचे मेसेज आणि ईमेलची चिंता त्यात अडसर निर्माण करु नये.
डॉक्टरांनुसार, दररोज अर्धा तास व्यायाम, सायंकाळी चहा आणि कॉफी टाळणे. तसेच एक दिवसात कमीत कमी सात तासांची झोप आपल्या हृदयाला निरोगी ठेवते.