जेवल्यानंतर झोप येतेय? असू शकतात हे गंभीर आजार! आजच जाणून घ्या यामागील कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:12 PM2021-08-18T15:12:31+5:302021-08-18T15:15:43+5:30
अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते.
शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही उर्जा आपल्याला अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा त्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते.
हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो अॅसिडआढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढल्याने झोप आल्यासारखे वाटते.
प्रत्येक व्यक्तीला ८ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, जेवल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.
डायबेटीज, थायरॉईड, अॅनिमिया आदी आजारांमुळेही दिवसा झोप येण्याची शक्यता असते. अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन झाल्यासही खूप झोप येते. तसेच कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जर आपल्याला जेवणानंतर येणाऱ्या डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण आहारात साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.