झोपण्याआधी खा हे एक फळ, झोप न येण्याची समस्या झटक्यात होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 11:29 AM2023-12-05T11:29:45+5:302023-12-05T11:41:52+5:30
स्लीप चॅरिटीने 2024 मध्ये चांगल्या गुणवत्तेची झोप कशी घेता येईल, यासाठी पाच सल्ले दिले आहेत.
जगभरातील अनेक लोक झोप न येण्याची तक्रार करतात. ज्यांना ही समस्या आहे अशा लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्लीप सपोर्टशी संबंधित एका चॅरिटीच्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा तर झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी एक फळ फार चांगला पर्याय आहे. स्लीप चॅरिटीने 2024 मध्ये चांगल्या गुणवत्तेची झोप कशी घेता येईल, यासाठी पाच सल्ले दिले आहेत. ज्यात बेडवर झोपण्याच्या काही वेळाआधी फळांच्या सेवनाला जास्त महत्व दिलं आहे.
त्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, खाण्यासाठी ज्या फळाबाबत सांगण्यात आलं आहे, ते केळी आहे. केळींमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं. हे दोन्ही तत्व मनुष्याच्या शरीरातील तणाव कमी करण्यास सहायक आहे. ज्यामुळे मांसपेशींना आराम मिळण्यास मदत होते. केळींमध्ये अमिनो अॅसिड ट्रिप्टोफॅनही असतं. जे मेंदुला शांत करणारे हार्मोनचं उप्तादन करतं.
चॅरिटीमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, केळी एक असं फळ आहे, जे मेलाटोनिनच्या उत्पादनाला प्रोत्साहन देतं. ज्याची तुमच्या झोपेत महत्वाची भूमिका असते. एका अॅंटी-ऑक्सिडेंट विशेष अंकात प्रकाशित एका रिसर्चनुसार, फळांमध्ये द्राक्ष, टार्ट चेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये मेलाटोनिन भरपूर असतं.
चॅरिटीनुसार केवळ फळंच नाहीतर बदाम, मास, कडधान्य आणि पनीरसोबत ओटकेक या अशा गोष्टी आहेत ज्याने व्यक्तीचा तणाव दूर होतो आणि व्यक्तीला चांगली झोप लागते. तेच असंही म्हटलं जात आहे की, ब्रेड, पास्ता आणि तांदूळ सारखे हाय कार्बोहाइड्रेट असलेले पदार्थ तुमच्या अॅसिड उत्पादनाला उत्तेजित करतात. ज्यामुळे व्यक्तीला झोप येण्यास समस्या होते.
त्याशिवाय हेही सांगितलं गेलं की, जर तुम्ही जास्त चॉकलेट खात असाल तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि याने तुमची झोप प्रभावित होते. स्लीप चॅरिटीच्या डेप्युटी सीईओ लिसा आर्टिस म्हणाल्या की, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी झोप फार महत्वाची आहे आणि आम्हाला वाटतं की, सगळ्यांनी ती भावना समजून घ्यावी. सगळ्यांनी झोपेचं महत्वं समजून घेतलं पाहिजे.
त्यांनी फारच जोर देऊन हे सांगितलं की, चांगल्या झोपेसाठी व्यवस्थित प्लान केला आणि त्यावर कायम राहिले तर त्याने सकारात्मकता वाढेल आणि सोबतच तणावही कमी होईल. ज्याचा अर्थ असा होतो की, आपण नेहमीच फ्रेश राहू.