7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; तज्ञांचा धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:44 PM2023-03-04T16:44:39+5:302023-03-04T16:45:28+5:30

आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

sleep deprivation know what happen if you not get enough sleep | 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; तज्ञांचा धडकी भरवणारा रिपोर्ट

7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; तज्ञांचा धडकी भरवणारा रिपोर्ट

googlenewsNext

पुरेशी झोप घेणं किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. झोपेच्या कमतरतेमुळे, शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात, ज्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, प्रत्येक व्यक्तीने रात्री 9 तासांची झोप पूर्ण केली पाहिजे. मात्र, आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहीत आहे का की चांगली झोप न मिळाल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात?

द सनच्या रिपोर्टनुसार, निद्रानाशामुळे तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळे निर्माण होतात. नीट झोप न लागल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. काही लोकांना खाण्याची जास्त इच्छा, राग आणि चिडचिड देखील जाणवते. याशिवाय थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि चुका होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही तीन दिवस पुरेशी झोप घेतली नाही तर ही लक्षणे तुमच्यामध्ये वेगाने दिसू लागतील.

पुरेशी झोप न मिळाल्याने वाढते वजन

काही लोकांना काही सेकंदांची झोप येते, ज्याला मायक्रोस्लीप म्हणतात. ही झोप 30 सेकंद टिकते आणि अनेक वेळा तुम्हाला त्याची जाणीवही नसते. झोपेच्या कमतरतेमुळे, तुम्ही तुमच्या कामात सक्रिय राहणार नाही किंवा झटपट निर्णय घेऊ शकणार नाही. असेही मानले जाते की ज्यांना नीट झोप येत नाही, त्यांचे वजनही झपाट्याने वाढते.

रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम 

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक दिवसातून 7 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते. तर जे लोक 7 तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना या समस्येचा सामना करावा लागत नाही. आपल्या शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी चांगली झोप आणि विश्रांतीची आवश्यकता असते. पण जेव्हा आपण हे करत नाही तेव्हा शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्तीवर देखील वाईट परिणाम करते, ज्यामुळे अनेक रोग होऊ शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: sleep deprivation know what happen if you not get enough sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.