सॉक्स घालू झोपता का? चुकूनही करू नका अशी चूक, एक्सपर्टने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 02:12 PM2023-09-14T14:12:35+5:302023-09-14T14:13:40+5:30
Health Tips : तुम्हीही असं करत असाल तर लगेच असं करणं बंद करा. स्लीपिंग एक्सपर्टनुसार, सॉक्समध्ये डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया असतात.
Health Tips : काही लोकांना रात्री सॉक्स घालून झोपण्याची सवय असते. त्यांना वाटतं की, याने त्याना चांगली झोप येईल. अनेकदा लोक बाहेरून येतात तेव्हा त्याच कपड्यांवर आणि सॉक्स घालून झोपतात. तुम्हीही असं करत असाल तर लगेच असं करणं बंद करा. स्लीपिंग एक्सपर्टनुसार, सॉक्समध्ये डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया असतात.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, यात टॉयलेटमध्ये असतात तेवढे किंवा झुरळांच्या विष्ठेत जेवढे बॅक्टेरिया असतात तेवढे असतात. जर तुम्ही सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्ही रात्रभर बॅक्टेरियाच्या संपर्कात रहाल याने तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.
एक्सपर्ट सांगतात की, तसे तर बेडवर सॉक्स घालून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. झोप लवकर आणि चांगली येते. तुम्ही जास्त वेळ झोपू शकता. मॅट्रेसनेक्स्टडेचे स्लीपच्या प्रोफेशनल्सनुसार, हे महत्वाचं आहे की, तुम्ही बेडवर झोपण्याआधी स्वच्छ सॉक्स घाला. अस्वच्छ सॉक्स घालून झोपल्याने तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.
मिररच्या एका रिपोर्टनुसार, एक्सपर्टने सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 पर्यंत घातलेल्या सॉक्सची टेस्ट केली. त्याद्वारे यात कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात हे चेक केलं. तेव्हा समजलं की, काही सॉक्समध्ये स्यूडोमोनास एरुगिनोसा नावाचा एक बॅक्टेरिया होता. जो अनेक प्रकारच्या इन्फेक्शनचं कारण ठरू शकतो.
फुप्फुसानाही होऊ शकतं इन्फेक्शन
एक्सपर्टने सांगितलं की, हे बॅक्टेरिया तुमच्या श्वसन तंत्राला आपलं शिकार बनवू शकतात. इतकंच काय तर तुमच्या फुप्फुसांनाही इन्फेक्शन होऊ शकतं. तुमच्या घरातील वस्तूंमध्ये पसरू शकतात. कितीही साफ केलं तरी ते साफ होत नाहीत. टेस्टमधून समोर आलं की, सॉक्सवर डोरमॅट इतकेच बॅक्टेरिया होते. टीव्ही रिमोटवरही तेवढेच बॅक्टेरिया आढळून आले जेवढे टॉयलेटमध्ये असतात. सॉक्स घालून झोपणं चांगलंही ठरू शकतं आणि घातकही. पण काळजी घेतली तर धोका टाळू शकता.