रात्री कमी झोप होते? तुम्ही 'या' गंभीर आजाराच्या जाळ्यात तर आला नाहीत ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:44 AM2019-02-11T11:44:45+5:302019-02-11T11:45:03+5:30
काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, ९ किंवा १० वाजता घरातील सर्व लोक गार झोपलेले असायचे. पण आता रात्री उशीरापर्यंत जागणे सामान्य बाब झाली आहे.
काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, ९ किंवा १० वाजता घरातील सर्व लोक गार झोपलेले असायचे. पण आता रात्री उशीरापर्यंत जागणे सामान्य बाब झाली आहे. नोकरी करणाऱ्या महिला असो वा हाऊसवाइफ जेवण आणि रात्रीची कामे झाल्यावर झोपण्याआधीचा वेळ त्या त्यांचा फ्री टाइम समजू लागल्या आहेत. या वेळात जास्तीत जास्त महिला त्यांच्या आवडत्या मालिका बघतात, सिनेमे बघतात किंवा फोनमध्ये वेळ घालवतात. अनेकजण रात्री लवकर झोपच येत नसल्याचीही सतत तक्रार करत असतात.
तुम्हालाही रात्री झोप येत नसेल किंवा तुम्ही रात्री उशीरापर्यंत स्मार्टफोन किंवा व्हॉट्सअॅपवर किंवा वेब सीरिजचा आनंद घेत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. एका ताज्या संशोधनानुसार, जर तुम्ही कमी झोप घेत असाल तर तुम्हा अल्झायमर डिजीज होण्याचा धोका अधिक आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी सांगितले की, एका रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने एक विशेष प्रोटीन बीटा एमीलोइड वाढतं. या प्रोटीनला एल्झायमर डिजीजशी संबंधित मानलं जातं.
बीटा एमीलॉइज मेंदूमध्ये वाढतात
अल्झायमर डिजीजमध्ये बीटा एमीलॉइड प्रोटीन मिळून एमीलॉइड प्लाक्स तयार करतात. हे या आजाराची खास ओळख आहे. या संशोधनाचे संशोधक जॉर्ज एफ खूब म्हणाले की, या संशोधनातून हे समोर आलं आहे की, झोप पूर्ण न झाल्याने आपल्या शरीरात याचा किती खोलवर प्रभाव पडतो.
अभ्यासकांनी बीटा एमीलॉइड एकत्र होणे आणि झोप यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी २० निरोगी लोकांच्या मेंदूची तपासणी केली. यांचं वय २२ ते ७२ इतकं होतं. यांच्यावर एक रात्र झोप घेतल्यानंतर आणि एका रात्री ३१ तासांपर्यंत जागी असताना परिक्षण करण्यात आलं.
काय आढळलं?
यातून असं समोर आलं की, एक रात्र झोप न मिळाल्याने बीटा एमीलॉइड प्रोटीनमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली होती. हे प्रोटीन मेंदूच्या थेलेमस आणि हिप्पोकॅम्पस यांसारख्या भागांमध्ये वाढले होते. हे अल्झायमरच्या सुरूवातीच्या काळात फार संवेदनशील असतात. या अभ्यासात असंही आढळलं की, ज्या लोकांमद्ये बीटा एमीलॉइड फार जास्त प्रमाणात वाढले होते, त्यांची झोप पूर्ण न झाल्याने मूडची खराब होता.
झोप पूर्ण न झाल्याने दिवस खराब होतो
झोप पूर्ण न झाल्याने केवळ मेंदूवरच नाही तर संपूर्ण शरीरावरच वाईट प्रभाव पडतो. पुरेशी झोप न झाल्याने तुम्हाला फ्रेश वाटत नाही. मेंदू रिलॅक्स होत नसल्याने तुम्हाला सतत थकवा जाणवतो, अंगदुखी होऊ लागते आणि कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.
इतकेच नाही तर आवडीच्या गोष्टी करूनही तुम्हाला आनंद जाणवत नाही. त्यामुळे तुमचं खाणं-पिणं आणि दैंनदिन जीवन प्रभावित होतं. त्यामुळे वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेण्याची सवय लावणे हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. याने अनेक आजार तुमच्यापासून दूर राहण्यास मदत मिळते.