By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 05:30 PM2016-10-18T17:30:56+5:302016-10-18T17:51:47+5:30
बऱ्याचजणांना दुपारी झोपायची सवय आहे.
Next
/>बऱ्याचजणांना दुपारी झोपायची सवय आहे. मात्र एका संशोधनानुसार दुपारी झोपणे आरोग्यासाठी घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे. जर आपण दिवसा एक तासापेक्षा अधिक झोप घेत असाल तर आपणास टाइप-२ डायबिटीजचा धोका उद्भवण्याची शक्यता ४५ टक्के आहे. हे संशोधन टोकियो विद्यापीठात करण्यात आले आहे. ३ लाख लोकांवर झालेल्या या संशोधनानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. दिवसा तासापेक्षा अधिक झोपणे हे धोकादायक ठरु शकते. जास्त झोपल्याने हा धोका आणखी वाढू शकतो. ४० मिनिटांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्याना डायबिटीजचा धोका नसतो.