सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 02:06 PM2021-02-26T14:06:47+5:302021-02-26T14:06:59+5:30
Health Care : मेडिकल जर्नल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, रात्री दहा वाजताच्या आधी झोपणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
चांगली आणि भरपूर झोप घेणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टरही रूग्णांना पुरेशी म्हणजे किमान ७ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. पण झोपेच्या चुकीच्या सवयी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत असतात. टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित एका वृत्तानुसार, मेडिकल जर्नल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, रात्री दहा वाजताच्या आधी झोपणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
या रिसर्चनुसार रात्री दहा वाजत्याआधी झोपल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. तर उशीरा झोपल्याने मेटाबॉलिज्मशी संबंधित आजार आणि जीवलशैलसंबंधी समस्या होण्याा धोका राहतो. रात्री १० वाजताच्या आधी झोपण्याच्या सवयीने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकने मृत्यूचा धोका साधारण ९ टक्के वाढतो. रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांनी स्लीप मेडिसिनमध्ये लिहिले की, २१ पेक्षा जास्त देशात रात्री १० वाजताआधी झोपणाऱ्यांच्या ५,६३३ लोकांच्या मृत्यूचा अभ्यास केला गेला. यातून समोर आले की, यातील ४,३४६ मृत्यूचं कारण हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होतं. (हे पण वाचा : सावधान! दारू न पिणाऱ्यांचंही लिवर होऊ शकतं खराब, जाणून घ्या कारण...)
तेच रिसर्चमधून असंही समोर आलं की, अर्ध्या रात्री झोपणाऱ्या लोकांमध्ये आजार आणि मृत्यूचा धोका इतर लोकांच्या तुलनेत १० टक्के वाढतो. याबाबत डॉक्टर वी. मोहन म्हणाले की, 'आपण सर्वांनाच माहीत आहे की, प्रत्येकासाठी ७ ते ८ तास झोप घेणं महत्वाचं आहे. पण उशीरा किंवा लवकर झोपण्याऐवजी योग्य वेळेवर फार महत्वाचं असतं'. (हे पण वाचा : हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!)
रिसर्च दरम्यान आम्ही झोपणे आणि घटनांमध्ये जोखिम यांच्यात यू शेपचा ताळमेल बघितला. यातून असं समोर आलं की, ज्या लोकांची झोपायची वेळ १० वाजता ते मध्यरात्री या दरम्यानचा होता त्यांच्यासाठी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका फार कमी होता.
सोबतच हा धोका त्या लोकांसाठीही कमी होता जे लोक रात्री ९ वाजता ते रात्री १ वाजता दरम्यान झोपतात. पण ग्राफमधून अशीही बाब समोर आली की, मृत्यूला आमंत्रित करणारे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त त्या लोकांना आहे जे सायंकाळी किंवा सायंकाळी ७ वाजताच्या आधी झोपतात'.