रात्री झोपताना लाईट सुरू ठेवताय? मग हे वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 05:40 PM2018-08-11T17:40:01+5:302018-08-11T17:41:45+5:30
तुम्ही रोज रात्री झोपताना लाईट सुरु ठेवून झोपता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(Image Credit : huffingtonpost.com)
तुम्ही रोज रात्री झोपताना लाईट सुरु ठेवून झोपता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नुकत्याच झालेल्या रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, रात्री लाईट सुरू ठेवून झोपल्यानं तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
रिसर्चनुसार, रात्री लाईट सुरू ठेवून झोपल्यामुळे लाईटच्या किरणांचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. त्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता असते.
आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. जे सूर्य आणि चंद्राच्या किरणांमुळे नियंत्रित होत असतं. पण कृत्रिम लाईटमुळे या क्लॉकच्या कार्यात अडथळे येतात. त्यामुळे लाईट सुरू ठेवून झोपू नये.
जर आपण रात्री झोपताना लाईट सुरू ठेवत असू तर त्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी अॅक्टिव्ह होतात. एका संशोदनातून असे सिद्ध झालं आहे की, झोपताना लाईट सुरू ठेवून झोपल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 22 टक्क्यांनी वाढतो.
लाईट सुरू ठेवून झोपल्यामुळे झोपेतही अडथळे येतात. याचा अनुभव तुम्हीही कदाचित घेतला असेल. आपण झोपलेलो असताना जर आपल्या आजूबाजूला लॅपटॉप किंवा मोबाईलची लाईट सुरू असेल तर आपली झोप आपोआप मोडते.
झोपताना लाईट लावून झोपणं आपल्या मूडवर परिणाम करतं त्याचप्रमाणे आपल्या हृदयावरही परिणाम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडण्याचा धोका अधिक असतो. तसेच लाईट लावून झोपल्यामुळे आपल्या ब्लड प्रेशरवरही परिणाम करतं. तसेच आपल्या मेंदूवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.