८ तासांपेक्षा जास्त झोप घेता? जीवाला होऊ शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 10:58 AM2018-08-08T10:58:43+5:302018-08-08T10:59:41+5:30

अनेकदा तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की, ७ ते ८ तास झोप घेणे आरोग्यासाठी चांगलं मानलं आहे. इतक्या तासांच्या झोपेने तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू शकता, तुम्हाला याने मानसिक समाधान मिळू शकतं.

Sleeping more than 8 hours is not healthy, Risk of dying in young age says report | ८ तासांपेक्षा जास्त झोप घेता? जीवाला होऊ शकतो धोका!

८ तासांपेक्षा जास्त झोप घेता? जीवाला होऊ शकतो धोका!

Next

(Image Credit : YouTube)

अनेकदा तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की, ७ ते ८ तास झोप घेणे आरोग्यासाठी चांगलं मानलं आहे. इतक्या तासांच्या झोपेने तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू शकता, तुम्हाला याने मानसिक समाधान मिळू शकतं. पण जर तुम्ही ८ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तुमच्यासाठी ते फार नुकसानकारक ठरु शकतं. 

असे आम्ही नाही एका शोधात सांगण्यात आले आहे. या शोधानुसार, जे लोक ८ तासांपेक्षा जास्त झोप घेतात त्यांचा लवकर आणि वेळेच्याआधी मृत्यू होण्याची शक्यता अधिक वाढते. अभ्यासकांना या शोधात आढळून आले की, जे लोक रात्री ८ तासांपेक्षा जास्त झोप घेतात, त्यांचा मृत्यू लवकर होण्याची शक्यता ७ तास झोपणाऱ्यांपेक्षा अधिक असते. 

हा रिपोर्ट जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 'हफिंगटन पोस्ट यूके'नुसार, या अभ्यासात जगभरातील ३३ लाख लोकांना सामिल करण्यात आले होते. या शोधातून असे समोर आले की, ८ तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयासंबंधी आजार आणि स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असतो. 

या सांगण्यात आलं आहे की, जे लोक अधिक झोपतात, ते शारीरिक रुपाने कमी अॅक्टीव्ह असतात. अशात त्यांना हृदयाशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता अधिक असते. 

या शोधातून असेही समोर आले आहे की, जे लोक रोज ७ ते ८ तासादरम्यान झोप घेतात त्यांना अशाप्रकारचे आजार होण्याची शक्यता कमी असते. तसेच यात सूचनाही देण्यात आली आहे की, जे लोक कमी झोपतात त्यांनाही हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. आणि ही समस्या हळूहळू वाढते. 

शोधानुसार, जे लोक रात्री ९ तास झोपतात, त्यांच्या मृत्यू दरात १४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर १० तास झोपणाऱ्यांचा मृत्यू दर ३० टक्के आणि ११ झोपणाऱ्यांचा मृत्यूदर ४७ टक्के होता. 

Web Title: Sleeping more than 8 hours is not healthy, Risk of dying in young age says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.