खुर्चीत बसून झोपायची सवय असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:20 AM2022-08-08T10:20:26+5:302022-08-08T10:30:26+5:30

आम्ही तुम्हाला खुर्चीत बसून झोपण्याचे चांगले आणि वाईट परिणाम सांगणार आहोत.

Sleeping on chair is it good or bad to sleep sitting in a chair how does it affect health | खुर्चीत बसून झोपायची सवय असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या सत्य

खुर्चीत बसून झोपायची सवय असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

अनेकांना बसल्या बसल्या झोपण्याची सवय असते. काही लोक कम्प्युटरसमोर काम करता करता तिथेच झोपतात. अशा प्रकारे झोपणे त्या क्षणासाठी आरामदायक वाटू शकते, परंतु नंतर तुम्हाला तीव्र पाठदुखी, मान आणि खांद्यावर कडकपणा येऊ शकतो. तासनतास शांत बसणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने तुमच्या सांध्यांवर परिणाम होऊ शकतो. यासोबत अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात. मात्र याचे काही फायदेदेखील आहेत. आज आम्ही तुम्हाला खुर्चीत बसून झोपण्याचे चांगले आणि वाईट परिणाम सांगणार आहोत.

खुर्चीत बसून झोपण्याचे दुष्परिणाम
- जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो तेव्हा आपल्या हात आणि पायांचे स्नायू ताणले जातात आणि विश्रांती घेतात. मात्र बसून झोपल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि हालचालींवर मर्यादा येतात. यातून नवीन समस्या येतात.

- जर तुम्हालाही बसून झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. झोपेमुळे तुमच्या स्पायनल कॉलमचा आकार खराब होतो. त्यामुळे पाठदुखीच्या तक्रारी तर होऊ शकतात, सोबतच पाठीला सूजही येऊ शकते.

- जास्त वेळ एकाच स्थितीत झोपल्यामुळे तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. यासोबतच मुंग्या येण्याची समस्यादेखील होऊ शकते, पायांमध्ये रक्ताची गुठळी देखील होऊ शकते, ज्यामुळे चालण्यात अडचण येऊ शकते.

- बसून झोपल्यामुळेही सांधे जड होण्याची समस्या उद्भवते. एवढेच नाही तर झोपेमुळे पायांच्या नसांमध्ये ताण येऊ शकतो. यासोबतच बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे शरीराची हालचाल शक्य होत नाही.

खुर्चीत बसून झोपण्याचे फायदे
- गरोदरपणात महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपण्याची योग्य स्थिती, अशा स्थितीत महिला नेहमी योग्य मार्गाच्या शोधात असतात. तेव्हा बसून झोपणे त्यांच्यासाठी खूप आरामदायी ठरू शकते.

- खुर्चीत बसून झोपल्‍याने जठराच्‍या अनेक प्रकारच्या प्रॉब्लेमवर मात करता येते. जर आपल्याला नीट झोप येत नसेल तर आपल्याला बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत बसून झोपणे प्रभावी ठरू शकते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि गॅस बद्धकोष्ठता दूर होते.

- झोपेत असताना अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. पण जेव्हा ते खुर्चीत बसून झोपतात तेव्हा त्याचे स्नायू उघडे राहतात. ज्यामुळे झोपताना श्वास घेण्याचा त्रास दूर होतो. त्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया बसून झोपल्याने निघून जातो.

खुर्चीत बसून झोपल्याने मृत्यूही होऊ शकतो का?
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ खुर्चीत बसून झोपल्याने यापनमध्ये वेदना होणे, पायांना सूज येणे आणि गंभीर परिस्थितींमध्ये पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे. याचा त्रास होऊ शकतो. कोणतीही हालचाल न करता एका ठिकाणी बसणे आणि झोपणे किंवा बराच वेळ बसणे आणि झोपणे यामुळे अशी नकारात्मक परिस्थिती उद्भवू शकते. वेळीच उपचार न घेतल्यास परिस्थिती बिघडू शकते आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.

खुर्चीत बसून झोपताना घ्या ही काळजी
जर तुम्हाला खुर्चीत बसून झोपायचे असेल तर तुम्ही रिक्लिनर्सचा वापर करू शकता. झोपण्यासाठी कोणतीही अस्ताव्यस्त स्थिती नाही याची खात्री करा. ज्यांना झोपेच्या वेळी श्वासोच्छवासाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना चांगली झोप येण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

Web Title: Sleeping on chair is it good or bad to sleep sitting in a chair how does it affect health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.