जमिनीवर झोपणे आहे इतके फायदेशीर की पलंग सोडुन जमिनीवरच झोपाल, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 06:33 PM2022-05-05T18:33:59+5:302022-05-05T18:36:20+5:30

तुम्हाला पलंगावर/ गादीवर झोपण्याचा त्रास होत असेल, काही प्रकारच्या शारीरिक समस्या असतील तर एक-दोन दिवस जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला फायदा (Sleeping on the Floor Benefits) होईल.

sleeping on floor is extremely beneficial for health, but this people should avoid | जमिनीवर झोपणे आहे इतके फायदेशीर की पलंग सोडुन जमिनीवरच झोपाल, जाणून घ्या अधिक

जमिनीवर झोपणे आहे इतके फायदेशीर की पलंग सोडुन जमिनीवरच झोपाल, जाणून घ्या अधिक

googlenewsNext

लोकांना जाड गादीवर झोपण्याची सवय असते. पण, बहुतेक गाद्या या आरामदायी नसतात, त्यामुळे पाठ, कंबर, मानदुखीचा त्रास वाढतो. पलंगावर झोपण्यास त्रास होत असेल तर काही दिवस जमिनीवर किंवा फरशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. आजही लहान शहरे आणि खेड्यांमध्ये बहुतेक लोक जमिनीवर चटई टाकून झोपतात. जमिनीवर झोपण्याचे फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची मुद्रा योग्य राहते. जर तुम्हाला पलंगावर/ गादीवर झोपण्याचा त्रास होत असेल, काही प्रकारच्या शारीरिक समस्या असतील तर एक-दोन दिवस जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला फायदा (Sleeping on the Floor Benefits) होईल.

उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्याने थंडावा जाणवतो -
SleepFoundation.org मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, उन्हाळ्यात जमिनीवर किंवा फरशीवर झोपल्याने चांगली झोप येते, कारण फरशी किंवा जमीन थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता लवकर कमी होते. विशेषतः उन्हाळ्यात, चांगली झोप येण्यास मदत होते. मात्र, ज्यांच्याकडे एसी, कुलर आहे, ते बेडरूममध्ये बेडवर झोपणे पसंत करतात. कूलर, एसीशिवाय चांगल्या झोपेसाठी सरळ जमिनीवर किंवा फरशीवर झोपणे फायदेशीर आहे.

पाठदुखी -
ज्या लोकांना कंबर किंवा पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी फक्त मजबूत पृष्ठभागावर (firm surface) झोपावे. सपाट जागेवर झोपल्याने तुम्हाला वेदना कमी होऊ शकतात. काही लोक अशा गाद्यांवर झोपतात, ज्या त्यांच्या शरीराच्या वजनासाठी खूप मऊ असतात. जेव्हा गादी खूप मऊ असते, तेव्हा तुमचे शरीर गादीवर योग्य मुद्रेत झोपू शकत नाही. त्यामुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात. अशा स्थितीत तुमचा मणका अलाइनमेंटमधून थोडा बाहेर पडतो. यामुळे मणक्यावर दबाव येतो आणि पाठदुखी सुरू होते.

पोस्चर सुधारला जाऊ शकतो -

जमिनीवर झोपल्याने शरीराची स्थिती योग्य राहते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने मान, पाठदुखीचा त्रास वाढतो. यामुळे लवचिकता कमी होणे, मणक्याचे चुकीचे संरेखन आणि दुखापतीचा धोका वाढू शकतो. चांगल्या पोस्चरमध्ये मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला सपोर्ट मिळतो. जमिनीवर झोपून पाठीचा कणा सरळ ठेवणे सोपे जाते, कारण मऊ गादीमध्ये शरीर सरळ राहू शकत नाही.

कोणी जमिनीवर झोपू नये -
जास्त वय असलेल्या वृद्धांनी जमिनीवर झोपणे टाळावे. ज्या लोकांना काही आरोग्य समस्या आहेत जसे की, उठता-बसताना त्रास होतो, हाडांशी संबंधित समस्या इत्यादी. खाली झोपल्याने संधिवात, ऑस्टिओपोरोसिसमध्ये जास्त त्रास वाढू शकतो. विशेषत: उठताना आणि बसताना त्रास होत असेल तर जमिनीवर झोपू नका.

Web Title: sleeping on floor is extremely beneficial for health, but this people should avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.