तुम्हीही पोटावर झोपता का? शरीराला होतात 'हे' अनेक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:56 PM2024-01-01T14:56:54+5:302024-01-01T14:57:35+5:30

बरेच लोक असे असतात जे झोपताना पोटावर झोपतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. ते कसं हे आज जाणून घेऊ.

Sleeping on the stomach can cause major harm to health | तुम्हीही पोटावर झोपता का? शरीराला होतात 'हे' अनेक नुकसान

तुम्हीही पोटावर झोपता का? शरीराला होतात 'हे' अनेक नुकसान

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हेल्दी डाएट आणि चांगली झोप फार महत्वाची असते. आरोग्य चांगलं ठेवण्यात झोपेची फार महत्वाची भूमिका असते, रोज रात्री सामान्यपणे 7 ते 8 तास झोप घेणं फार महत्वाचं असतं असं डॉक्टर सांगतात. बरेच लोक असे असतात जे झोपताना पोटावर झोपतात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. ते कसं हे आज जाणून घेऊ.

झोप न येण्याची समस्या

आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणं फारच अवघड झालं आहे. झोपताना योग्य पोझिशन मिळत नसल्याने झोपेचं खोबरं होतं. अनेक लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. जी शरीरासाठी नुकसानकारक असते.

पचन होण्यास अडचण

रात्री किंवा जेवण केल्यावर पोटावर झोपल्याने समस्या होऊ शकते. पोटावर दबाव पडल्याने अन्न पचन होण्यास समस्या होते. यामुळे सकाळी तुम्हाला पोट फुगण्याची आणि पोट साफ न होण्याची समस्या होते.

बद्धकोष्ठता

पोटावर झोपल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता, पोटदुखी, गॅस अशा समस्या होऊ शकतात. तसेच पोटावर झोपल्याने पाठीच्या मणक्यावरही प्रभाव पडतो. 

शरीरात वेदना

पोटावर झोपल्याने शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदना होण्यची समस्या होते. सोबतच शरीरात झिणझिण्याही येतात.

मानेत वेदना

पोटावर झोपल्याने मानेतही वेदना होऊ शकतात. तुमच्या शरीरातही वेगवेगळ्या भागात वेदना होऊ शकतात. 

Web Title: Sleeping on the stomach can cause major harm to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.