Sleeping Problem: डोळे बंद करुनही झोप लागत नाही...?; फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:56 PM2023-03-18T17:56:42+5:302023-03-18T17:56:56+5:30

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात.

Sleeping Problem: Can't sleep even after closing eyes...?; Just do this, get a restful deep sleep | Sleeping Problem: डोळे बंद करुनही झोप लागत नाही...?; फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप

Sleeping Problem: डोळे बंद करुनही झोप लागत नाही...?; फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप

googlenewsNext

आपलं आरोग्य  हीच आपली खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला  दीर्घायुष्य हवं असेल तर  निरोगी राहणंही तितकंच महत्वाचं आहे. वाढत्या वयात शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवायला सुरूवात होते.  अशा स्थितीत या कमतरतांकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही.असाच एक पोषक घटक म्हणजे लोह. शरीरात लोहाची कमतरता खूप सामान्य आहे. 

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. हे आपल्या शरीराचे असे खनिज आहे जे रक्तातील निरोगी रक्त पेशी बनवते. हिमोग्लोबिनसाठी लोहही खूप महत्त्वाचे असते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील स्लीप हार्मोन्सचे उत्पादनही कमी होते. 

लोहाच्या कमतरतेमुळे पीरियडिक लाईम मूव्हमेंट डिसऑर्डर नावाची समस्या उद्भवू शकते. हा एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. या विकारात रात्री झोपताना पायांमध्ये विचित्र वेदना जाणवतात, जे झोपेत अडथळा बनते. अभ्यासानूसार, झोपेची गुणवत्ता आणि लोह पूरक यांच्यात सकारात्मक संबंध आहे. लोहाच्या कमतरतेमुळे झोपेची गुणवत्ता, प्रमाण आणि वेळेवर परिणाम होतो. लोहयुक्त पदार्थांचे सेवन करून तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकता.

चांगली झोप येण्यासाठी टिप्स:

  • तुमची झोपेची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा.
  • तुमच्या आहारात या गोष्टी वाढवा. ज्यामध्ये भरपूर लोह असेल. जसे मांस, अंडी, हिरव्या भाज्या.
  • कॅफीन युक्त पेये पिणे बंद करा. जर तुम्ही ते पूर्णपणे सोडू शकत नसाल तर किमान संध्याकाळी सहानंतर घेऊ नका.
  • अल्कोहोल आणि निकोटीनचे सेवन अजिबात करू नका.
  • लोहाव्यतिरिक्त, अशा पदार्थांकडे लक्ष द्या, ज्यात व्हिटॅमिन डी देखील भरपूर आहे. 
  • लिंबूवर्गीय अन्न, ब्रोकोली, टोमॅटो यांसारख्या गोष्टी आहारात समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
  • दररोज काही व्यायाम करा.
  • रात्री जड जेवणाची किंवा रात्री खूप उशिरा जेवणाची सवय सोडा.
  • जर तुम्हाला मोबाईल पाहण्याची, लॅपटॉप चालवण्याची किंवा जास्त वेळ टीव्ही पाहण्याची सवय असेल, तर तीही बदला. 
  • झोपण्याआधी कमीतकमी २ ते ३ तास आधी कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहणे थांबवा.

Web Title: Sleeping Problem: Can't sleep even after closing eyes...?; Just do this, get a restful deep sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.