Health Tips : रात्री झोपताना ही एक चूक झाली तर वाढेल शुगर लेव्हल, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:10 PM2022-03-28T12:10:54+5:302022-03-28T12:11:21+5:30

Health Tips : एक रात्रही कृत्रिम प्रकाशात झोपले तर ग्लूकोज लेव्हल वाढू लागतं. मेटाबॉलिज्म वाढू लागतं आणि हृदयरोग, डायबिटीज, मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो.  

Sleeping with artificial light can be harmful to your health heart rate blood pressure and heart rate variability | Health Tips : रात्री झोपताना ही एक चूक झाली तर वाढेल शुगर लेव्हल, वेळीच व्हा सावध

Health Tips : रात्री झोपताना ही एक चूक झाली तर वाढेल शुगर लेव्हल, वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Health Tips : रात्री अनेक लोक रंगीत लाइट लावून झोपतात. त्यामुळे़च या लाइट्सची डिमांड मार्केटमध्ये खूप वाढली आहे. जर तुम्हीही असं काही करत असाल तुमचं आरोग्य धोक्यात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका रिसर्चनुसार, रात्री आर्टिफिशिअल लाइटमध्ये झोपल्याने शरीरावर निगेटिव्ह प्रभाव पडतो. हा रिसर्च  शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केला. त्यांनी झोपताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशाचा होणारा धोका याबाबत रिसर्च केला. रिसर्चमधून समोर आलं की, एक रात्रही कृत्रिम प्रकाशात झोपले तर ग्लूकोज लेव्हल वाढू लागतं. मेटाबॉलिज्म वाढू लागतं आणि हृदयरोग, डायबिटीज, मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो.  

रिसर्चनुसार, रात्री झोपताना आर्टिफिशिअल लाइटच्या प्रकाशाने इन्सुलिन रेजिस्टेंस वाढू शकतं आणि नर्वस सिस्टीम जास्त अॅक्टिव होऊ शकतं. वैज्ञानिकांनी कृत्रित प्रकाश आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर यांच्यात संबंध सांगितला आणि हे सिद्ध केलं की, झोपेच्या पॅटर्नमुळे मेटाबॉलिज्म संबंधी समस्या होऊ शकतात. या रिसर्चमध्ये २० लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. एका रूममध्ये कृत्रिम प्रकाश आणि एका रूममध्ये हलका प्रकाश ठेवला होता. दोन्ही रूममध्ये १०-१० लोकांन १ - १ दिवस झोपवण्यात आलं आणि मग त्यांचं आकलन करण्यात आलं.

आकलन केल्यानंतर असं आढळलं की, जे  लोक प्रकाश असलेल्या रूममध्ये झोपले होते त्यांचं इन्सुलिन १५ टक्के कमी झाल्याचं आढळलं होतं. तेच कमी प्रकाश असलेल्या रूममध्ये झोपणाऱ्या लोकांच्या इन्सुलिनमध्ये ४ टक्के कमी आढळून आली. जास्त प्रकाश असलेल्या रूममध्ये झोपणाऱ्या लोकांची इन्सुलिन लेव्हल वाढलेली दिसली. 

या रिसर्चमधून असा निष्कर्ष निघाला की, रात्रीच्या झोपेवेळी आर्टिफिशिअल लाइट नर्वस सिस्टीमला अॅक्टिव करून कार्डियोमेटाबॉलिक कामाला बदलतो. पण याने मेलाटोनिनच्या लेव्हलवर कोणताही प्रभाव पडत नाही. या रिसर्चचा प्रभाव शहरी लोकांवर अधिक होतो. कारण इथे इनडोर आणि आउटडोर प्रकाशात फार वाढ होत आहे. असे व्यक्ती जर रात्री झोपताना प्रकाश कमी करत असतील तर त्यांची झोपेची क्वालिटी वाढू शकते.
 

Web Title: Sleeping with artificial light can be harmful to your health heart rate blood pressure and heart rate variability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.