चालण्याच्या पद्धतीत करा 'हा' बदल; वजन कमी करण्यासाठी होईल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:24 PM2019-03-11T13:24:50+5:302019-03-11T13:25:58+5:30

सध्याची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि आहारातील असंतुलन यांमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच अनेकजण आपल्या कामाचा व्याप सांभाळून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात.

Small changes in your walking can help you loose weight | चालण्याच्या पद्धतीत करा 'हा' बदल; वजन कमी करण्यासाठी होईल मदत!

चालण्याच्या पद्धतीत करा 'हा' बदल; वजन कमी करण्यासाठी होईल मदत!

Next

सध्याची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि आहारातील असंतुलन यांमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच अनेकजण आपल्या कामाचा व्याप सांभाळून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. पण अनेकदा हे सर्व उपाय करता करता दमछाक होते. पण सगळेच उपाय एकत्र करण्याऐवजी तुम्ही वजन कमी करण्याची ही प्रक्रीया चालण्यापासून सुरू करू शकता. सुरूवातीला हा वजन कमी करण्यासाठीचा अत्यंत सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. सध्याच्या बीझी लाइफस्टाइलमध्ये लोकांना जिममध्ये जाण्यासाठी वेळच मिळत नाही. परंतु वॉक करण्यासाठी बीझी शेड्यूलमधून नक्कीच थोडासा वेळ काढला जाऊ शकतो. 

वजन कमी करण्यासाठी वॉक करत असाल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा :

1. चालण्याच्या गतिमध्ये बदल करा 

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, वॉक केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. ओहियो स्टेट यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, वेळोवेळी आपल्या चालण्याच्या वेगामध्ये बदल करून तुम्ही जास्त कॅलरी बर्न करू शकता. संशोधनानुसार, चालण्याच्या वेगामध्ये बदल केल्याने मेटाबॉलिज्म 20 टक्कांनी वाढतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी लांब वॉकसाठी अवश्य जा. 

2. दिवसा जास्त चालणं ठरतं फायदेशीर

आपल्यापैकी अनेक लोक एका ठराविक वेळी वर्कआउट करतात. लवकर वजन कमी करण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. आपल्या दिनक्रमामध्य 15 ते 20 मिनटांच्या वॉकचा अवश्य समावेश करा. जेव्हाही तणाव असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर वॉक करा. 

3. चढण असलेल्या ठिकाणी जास्त चाला

चढणं असलेल्या ठिकाणी जास्त चालल्याने जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचया आजूबाजूला एखादी अशी जागा शोधा, जिचा रस्ता एखाद्या डोंगराप्रमाणे चढण असलेला असेल. अशाप्रकारे चालल्याने तुम्ही 30 टक्के जास्त कॅलरी बर्न करू शकता. त्याचबरोबर असं चालल्याने मांसपेशी आणि मेटाबॉलिज्म दोन्ही मजबूत होण्यास मदत होते. 

 4. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर लिफ्टऐवजी जास्तीत जास्त पायऱ्या चढा आणि उतरा. याला तुम्ही तुमच्या डेली रूटिनचा एक भाग बनवा. 

5. ध्येय निश्चित करा

स्वतःला मोटिवेट करण्यासाठी एक ध्येय निश्चित करा. दिवसभरात जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. जेवढं जास्त चालण्याचा प्रयत्न कराल, तेवढं वजन कमी करणं सहज शक्य होइल. तणावापासून दूर रहा आणि वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा. 

Web Title: Small changes in your walking can help you loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.