ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:51 PM2019-03-18T12:51:52+5:302019-03-18T12:52:07+5:30

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही.

Small nap in afternoon can reduce your high blood pressure | ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च 

ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च 

Next

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही. पण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं संशोधन तुम्हाला तुमच्या बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ झोपेसाठी काढण्यासाठी तयार करू शकतं. कारण या नव्या संशोधनातून दुपारच्या वेळी थोडा वेळ झोपल्यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होतं आणि तुम्हाला हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोकाही कमी होतो. 

संशोधनानुसार, दुपारच्या वेळी थोडा वेळ झोपल्याने तुमचं ब्लड प्रेशर दुपारी न झोपणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतं. संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, दुपारी थोडा वेळ झोपल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडतात. हा परिणाम ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी असलेल्या औषधांप्रमाणेच असतात.
 
दरम्यान, या संशोधनासाठी 62 वर्षांच्या 212 लोकांची माहिती एकत्र केली. ज्यामार्फत असं समजलं की, जास्तीत जास्त लोकांचे ब्लड प्रेशर 130 mm Hg होतं. अमेरिकन हार्ट असोसिएशन गायडंसनुसार, सामान्य ब्लड प्रेशर 120 mm Hg किंवा त्यापेक्षा कमी असतं. संशोधना दरम्यान या 212 लोकांमधील काही लोकांना दुपारी झोपण्यास सांगण्यात आले, तर काहींना न झोपण्यास सांगितले. 

संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, ज्या व्यक्ती दिवसा 49 मिनिटांपर्यंत झोपतात, त्यांचं ब्लड प्रेशर 5mm/hg पर्यंत कमी होतं. एवढचं ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरची औषधं खाल्यानेही कमी होऊ शकतं. परंतु, जर थोडासा वेळ दिल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होणार असेल तर औषधं घेण्याची गरजच भासत नाही. 

संशोधनाचे मुख्या संशोधक कॅलिसट्राटोस यांच्यानुसार, जर आपलं ब्लड प्रेशर 2mm hg पर्यंत कमी होतं असेल, तर हृदयाच्या अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
संशोधनाचे महत्त्व याच गोष्टीमुळे समजण्यास मदत होते की, अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असून त्यांना हार्ट स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका अधिक आहे. तसेच भारतामध्ये प्रत्येक आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहे.

परंतु, ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर सोन्या बाबू नारायण या संशोधनाशी सहमत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, उत्तम आणि शांत झोप आवश्यक आहेच, पण अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, जर आपण आपल्या खाण्यामध्ये मीठाचा वापर कमी प्रमाणात केला त्याचबरोबर एक्सरसाइज आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवा. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्येपासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

Web Title: Small nap in afternoon can reduce your high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.