केवळ २५ मिनिटात यूरिन इन्फेक्शनची टेस्ट करून रिपोर्ट देणारा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:39 AM2020-01-10T10:39:23+5:302020-01-10T10:43:19+5:30

यूटीआयच्या अनेक केसेसमध्ये टेस्टची कमतरता आणि आजूबाजूला लॅबची व्यवस्थित व्यवस्था नसल्याने अनेक रूग्णांना अनावश्यक अ‍ॅंटी-बायोटिक्सचं सेवन करावं लागतं.

Smartphone may help to test and control urinary tract infections | केवळ २५ मिनिटात यूरिन इन्फेक्शनची टेस्ट करून रिपोर्ट देणारा स्मार्टफोन

केवळ २५ मिनिटात यूरिन इन्फेक्शनची टेस्ट करून रिपोर्ट देणारा स्मार्टफोन

Next

(Image Credit : healthline.com)

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथचे बायॉलॉजिकलच्या इंजिनिअर्सनी एक खासप्रकारचा स्मार्टफोन तयार केलाय. याद्वारे २५  मिनिटात डॉक्टरांना हे कळू शकतं की, रूग्णाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय आहे किंवा नाही. याने डॉक्टरांना रिपोर्टची वाट पाहत २४ तास बसावं लागणार नाही. आणि रूग्णावर लगेच उपचार करता येतील.

तज्ज्ञांनुसार, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या ८०० टक्के केसेसमध्ये  E.coli बॅक्टेरिया जबाबदार असतो आणि या स्मार्टफोनच्या माध्यमातून टेस्ट सोपी आणि पोर्टेबल होईल. आम्हाला आशा आहे की, प्रायमरी हेल्थ केअर आणि टेस्ट्समध्ये या फोनचा वापर विकसनशिल देशांमध्ये फार महत्वाची भूमिका बजावू शकतो.

तज्ज्ञ सांगतात की, यूटीआयच्या अनेक केसेसमध्ये टेस्टची कमतरता आणि आजूबाजूला लॅबची व्यवस्थित व्यवस्था नसल्याने अनेक रूग्णांना अनावश्यक अ‍ॅंटी-बायोटिक्सचं सेवन करावं लागतं. ज्याने त्यांची समस्या दूर होण्याऐवजी यूटीआय इन्फेक्शन वाढवणारे बॅक्टेरिया अधिक वाढवतात. याने रूग्णावरील उपचार त्रासदायक आणि जास्त वेळ चालू शकतो.

हा स्मार्टफोनवर करण्यात आलेल्या रिसर्च बायोसेंसर्स आणि बायोइलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून यूटीआय इन्फेक्शनची माहिती मिळवण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्टप्रमाणे यूरिन एका स्ट्राइपमध्ये घेऊन टेस्ट केली जाईल. 

यूरिनचं सॅम्पल आपल्या हाय सेंसर्स आणि कॅमेराच्या माध्यमातून स्मार्टफोन यूरिन सॅम्पलमधील ई-कॉली बॅक्टेरियाची ओळख पटवेल. नंतर २५ मिनिटांच्या आत रिपोर्ट मिळेल. याने रूग्णावर वेळेवर उपचार होऊ शकतील. हा स्मार्टफोन आता आपल्या क्लिनिकल टेस्टसाठी तयार आहे आणि त्यानंतर हा फोन लवकरच वापरासाठी बाजारात उपलब्ध करून दिला जाईल.


Web Title: Smartphone may help to test and control urinary tract infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.