जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:07 AM2019-01-02T11:07:49+5:302019-01-02T11:09:31+5:30

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सतत हसत रहावे असा सल्ला डॉक्टरही देतात. असेही सांगितले जाते की, नेहमी हसत-खेळत राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं.

Smiling makes you look older - research | जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

Next

(Image Credit : www.psychologies.co.uk)

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सतत हसत रहावे असा सल्ला डॉक्टरही देतात. असेही सांगितले जाते की, नेहमी हसत-खेळत राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं. पण एका रिसर्चमधून याउलट एक खुलासा करण्यात आला आहे. यात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जास्त हसल्याने तुमचं आयुष्य वाढणार नाही तर 'कमी' होणार. कारण जास्त हसल्याने तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या पडू लागतात आणि तुम्ही वयोवृद्ध दिसू लागता.  

इस्त्रायलच्या बेंगूरिसन यूनिव्हर्सिटीमध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे. यासाठी अभ्यासकांनी ४० लोकांना महिला आणि पुरुषांचे फोटो दाखवून त्यांच्या वयाचा अंदाज बांधण्यास सांगण्यात आले होते. ३५ फोटो महिलांचे तर ३५ फोटो पुरुषांचे दाखवण्यात आले. सर्वच ४० लोकांना महिला आणि पुरुषांचे दोन-दोन फोटो दाखवण्यात आलेत. यातील एका फोटोत ते हसत होते तर दुसऱ्यात त्यांचा चेहरा सामान्य होता. 

यातून निष्कर्ष काढण्यात आला की, सहघभागी लोकांनी हसत असलेल्या फोटोतील व्यक्तींना सामान्य चेहरा असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत एक वर्षाने अधिक असल्याचं सांगितलं. या शोधातून असं दिसून आलं की, हसणारा व्यक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वृद्ध दिसतो. कारण हसणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या अधिक स्पष्ट दिसतात. 

या रिसर्चचे मुख्य जवी गनेल यांनी सांगितले की, 'ही पहिलीच वेळ आहे की, हसणाऱ्या व्यक्तींना वृद्ध सांगितलं जात आहे. नाही तर आतापर्यंत हेच मानलं जात होतं की, हसण्याने आणि आनंदी राहण्याने व्यक्ती तरुण दिसतो'.

Web Title: Smiling makes you look older - research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.