आरोग्यासाठी फारच घातक आहे पिझ्झा, चिप्स, बर्गर; पतंजली नूडल्सही नाही सेफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:06 AM2019-12-19T10:06:33+5:302019-12-19T10:06:44+5:30

अलिकडे फास्ट फूडची लोकांना इतकी सवय लागली आहे की, एक दिवस जर फास्ट फूड खाल्लं नाही तर त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.

Snacks, pizza, noodles contain hazardous quantity of salt which is harmful for health | आरोग्यासाठी फारच घातक आहे पिझ्झा, चिप्स, बर्गर; पतंजली नूडल्सही नाही सेफ!

आरोग्यासाठी फारच घातक आहे पिझ्झा, चिप्स, बर्गर; पतंजली नूडल्सही नाही सेफ!

Next

अलिकडे फास्ट फूडची लोकांना इतकी सवय लागली आहे की, एक दिवस जर फास्ट फूड खाल्लं नाही तर त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भलेही तुम्ही हे पदार्थ खात असाल पण याने तुम्हाला दुरगामी परिणामांचा सामना करावा लागतो. म्हणजे जर तुम्ही डॉमिनोजचा एक नॉन व्हेज सुप्रीम रेग्युलर पिझ्झा किंवा पिझ्झा हटचा चिकन सुप्रीम पर्सनल पिझ्झा तुम्ही खाल्ला तर त्यानंतर तुमचा दिवसभराचा मिठाचा कोटा पूर्ण होतो. जर यानंतरही तुम्ही खाण्यातून मीठ घेत असाल तुम्ही स्वत: तुमच्या आरोग्यासोबत खेळ करताय.

किती कॅलरींची गरज

सीएसई म्हणजेच सेंटर फॉर साइन्स अ‍ॅंड एनवायरमेंटने हा दावा केला आहे. सीएसईने लॅब रिपोर्ट जाहीर करत सांगितले की, जंक फूडमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मीठ आणि फॅटचं प्रमाण असतं. सीएसईनुसार, एका व्यक्तीला पूर्ण दिवसात २ हजार किलो कॅलरींची गरज असते. ज्यात मिठाचं प्रमाण हे ५ ग्रॅम, फॅट ६० ग्रॅम, कार्बोहायड्रेट ३०० ग्रॅम आणि ट्रान्स फॅट २.२ ग्रॅमपेक्षा अधिक असायला पाहिजे. 

३३ जंक फूडच्या सॅंपलवरून रिसर्च

सीएसईनुसार, चिप्स, नूडल्स, पिझ्झा, बर्गर आणि चटपटीत पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण सर्वाधिक असतं. जुलैमध्ये सीएसईने या रिपोर्टवर काम सुरू केलं होतं. ज्यासाठी ३३ जंक फूड्सचे सॅंपल घेतले गेले. ज्यात वेगवेगळ्या ब्रॅंडचे चिप्स, चटपटीत पदार्थ, नूडल्स, सूप, बर्गर, फ्राइज, फ्राइड चिकन, पिझ्झा, सॅंडविचचे १९ सॅंपल घेतले गेले. हे सगळेच सॅंपल फूड चेन आणि दिल्लीतील रिटेल स्टोर इत्यादी ठिकाणांहून घेतले गेले.

हृदयरोगांचा धोका

सीएसई लॅबचे हेड मृणाल मलिक यांनी सांगितले की, ट्रान्सफॅटने हृदयरोगांचा धोका अधिक वाढत आहे. पण रिसर्चमधून समोर आले आहे की, सर्वच सॅंपलमध्ये कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांबाबत चुकीची माहिती दिली आहे. फूड रेग्युलेटर एफएसएसएआयने १०० ग्रॅमच्या पॅकेट बंद पदार्थात मीठ आणि फॅटच्या ठरवलेल्या प्रमाणात बदल केला. या प्रमाणापेक्षा मीठ आणि फॅट असल्यावर रेड लेबल राहणार. सीएसईनुसार, टू एम मल्टीग्रेन चिप्सच्या ३० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये एक ग्रॅम मिठाचं प्रमाण आढळून आलं. हे दुप्पट प्रमाण झालं. 


Web Title: Snacks, pizza, noodles contain hazardous quantity of salt which is harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.