​...म्हणून करावी रात्री अंघोळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 09:06 AM2018-04-07T09:06:51+5:302018-04-07T14:36:51+5:30

आपले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र बरेचजण शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांना दूर ठेवण्यासाठीच्या काही उपायांपैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे रात्री अंघोळ करणे होय

... so do the night at night! | ​...म्हणून करावी रात्री अंघोळ!

​...म्हणून करावी रात्री अंघोळ!

Next
ले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र बरेचजण शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांना दूर ठेवण्यासाठीच्या काही उपायांपैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे रात्री अंघोळ करणे होय. जाणून घेऊ या रात्री अंघोळ करण्याचे फायदे...

* चांगल्या झोपेसाठी
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री चांगली झोप येणे महत्त्वाचे असते. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो शिवाय तुम्हाला चांगली झोपही लागते. अंघोळीच्या पाण्यात इसेंस आॅईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. तसेच तुम्हांला एका वेगळ्या शांतीचा अनुभव येईल. झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केली तर शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते.
 
* चरबी कमी करण्यासाठी
आपल्या शरीरात व्हाईट आणि ब्राऊन असे दोन प्रकारचे फॅट असतात. व्हाईट फॅट हे आपल्या शरीरासाठी घातक तर दुसरे ब्राऊन फॅट आपल्या शरीरासाठी चांगले असते. आपल्या भोजनातून तयार होते ते व्हाइट फॅट असते. हे फॅट आपल्या शरीराच्या एका भागात गोळा होतात. तज्ज्ञांच्या मते आपण थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपले वजन आणि चरबी कमी होते.

* चमकत्या त्वचेसाठी 
पिंपल्सची समस्या असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. थंड पाण्याने अंघोळ केल्यावर केस चांगले होतात आणि त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र ओपन होते.

* रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी
थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. थंड पाण्याने रक्त पुरवठा चांगला होतो. इम्युनिटी लेवल वाढल्याने शरीरातील व्हाईट सेल्स वाढतात. अनेक आजाराशी लढण्यासाठी व्हाइट सेल्स मदत करतात. त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात.

* रक्त संचार वाढण्यासाठी
गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर रक्त संचार प्रथम उत्तेजित होतो, पण काही वेळातच तो मंद पडतो. पण थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो, हे लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार थंड पाणी मेंदूला थंड करण्यात मदत करतो. आपल्या दिवसाची सुरूवात थंड पाण्याने झाल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जातो. या शिवाय शारीरिक सौंदर्य टीकून राहते 

Web Title: ... so do the night at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.