...म्हणून सहा वर्षापेक्षा लहान मुलांना शाळेत पाठवायचे नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 09:04 AM2017-03-22T09:04:32+5:302017-03-22T14:34:32+5:30
आपणही आपल्या मुलाला सहा वर्षाच्या आत शाळेत पाठविण्याचा आग्रह धरताय का?
Next
सहा वर्षापेक्षा लहान मुलांना का शाळेत पाठवायचे नाही याविषयावर अगोदरही बरेच संशोधन झाले आहे. आतादेखील एका नव्या संशोधनानुसार हे स्पष्ट झाले आहे की, मुलांचे संपूर्ण शाळेचे करिअर उशिरानेच सुरु व्हायला हवे.
स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना किंडरगार्टनमध्ये पाचव्या वर्षापेक्षा सहाव्या वर्षी पाठविले आहे, त्यांच्यात सात आणि अकराव्या वयामध्ये उत्कृष्ट सेल्फ कंट्रोल म्हणजेच आत्मसंयम दिसून आला आहे.
मनोवैज्ञानिकांच्या मते, आत्मसंयम व्यक्तित्वाचा खूप महत्त्वाचा आणि विशिष्ट गुण आहे, ज्याला मुले आपल्या सुरुवातीच्या वयातच आत्मसात करुन घेतात. जर मुलांमध्ये हा गुण चांगल्याप्रकारे रुढ झाला तर येणाऱ्या समस्या आणि अडचणींवर तो मुलगा सहज मात करु शकतो.
सध्याच्या संशोधनात थॉमस डी आणि हॅन्स हेनरिक सीवर्जन या संशोधकांनी ‘दानिश नॅशनल बर्थ कोवर्ट’कडून डाटा कलेक्ट केला आहे. यात त्यांनी ७ वर्ष वयाच्या मुलाच्या मानसिक आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी ५४ हजार २४१ पालकांंची आणि ११ वर्ष वयाच्या मुलांच्या सुमारे ३५ हजार ९०२ पालकांची प्रतिक्रिया घेतली. यात असे आढळुन आले की, ज्या मुलांनी सरासरी मुलांच्या तुलनेने एक वर्ष उशिराने किंडरगार्टन सुरु केले होते त्यांच्यात हायपरअॅक्टिव्हिटीजमध्ये सुमारे ७३ टक्के चांगला परफॉर्मस् आढळुन आला.
उत्तर यूरोपीय देशांत मुलांना खूप उशिराने मुलांना शाळेत दाखल करण्याची परंपरा आहे. फिनलँडमध्ये तर मुलांना ८ वर्ष वयानंतर औपचारिक शाळेची सुरुवात करतात. या अगोदरचा त्यांचा वेळ एकतर घरात व्यतित होतो नाहीतर प्री-किंडरगार्टनमध्ये.