...म्हणून व्यायाम केलाच पाहिजे; ऐका सेलेब्रिटींच्या फिटनेस एक्स्पर्टकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 09:54 AM2023-08-06T09:54:48+5:302023-08-06T09:55:03+5:30

अनेकजण तज्ज्ञांचा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शरीराच्या व्याधींना सामोरे गेल्यावर त्यांना व्यायामाचे अचानक महत्त्व जाणवू लागते.

So exercise must be done; told by celebrity fitness expert leena mogare | ...म्हणून व्यायाम केलाच पाहिजे; ऐका सेलेब्रिटींच्या फिटनेस एक्स्पर्टकडून

...म्हणून व्यायाम केलाच पाहिजे; ऐका सेलेब्रिटींच्या फिटनेस एक्स्पर्टकडून

googlenewsNext

- लीना मोगरे
सेलेब्रिटी फिटनेस एक्स्पर्ट

आपण नेहमी तज्ज्ञांकडून ऐकत असतो. शरीर चांगले सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम केला पाहिजे. रोज ठरवून विशिष्ट वेळेत शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामध्ये रोज चालणे, प्राणायाम, योग घरच्या घरी किंवा जिममध्ये व्यायाम केला पाहिजे. मात्र, अनेकजण तज्ज्ञांचा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शरीराच्या व्याधींना सामोरे गेल्यावर त्यांना व्यायामाचे अचानक महत्त्व जाणवू लागते. अनेकजण वेळ नसल्याचे कारण पुढे करतात तर काही जण कंटाळा करत व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, व्यायाम न केल्यामुळे त्यांना कधी तरी आयुष्यात त्रास होतो. व्यायाम केल्याने आपण दिवसभर उर्जादायी राहू शकतो.

पावसाळा आला की, बहुतेक जणांचे बाहेर चालायला जाणे किंवा जिमला जाणे बंद होते. त्यामुळे अनेकजणांची चिडचिड होते. त्यामुळे या काळात घरी बसून कसा व्यायाम करता येईल, याचा ते विचार करतात. अनेकांना घरी व्यायाम कसा करायचा, हा प्रश्न पडतो.  बाहेर जाऊन चालल्यावर जितके फ्रेश वाटते तितके त्यांना घरात वाटत नाही, असे काही लोकांचे म्हणणे असते. त्यांनी पावसाळ्यात घरच्या घरी सोपा व्यायाम करावा. 

काय आहेत फायदे ? 
nवजन संतुलित राहण्यास मदत होते. 
nनैराश्याचे प्रमाण कमी होते. 
nतणावाचा सामना सक्षमपणे करता येतो.
nहृदय आणि रक्तदाब विकार होत नाही.
nशरीर आकर्षक राहते, त्यामुळे 
व्यक्तिमत्व उजळून निघते.
nशरीरातील हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
nमन उत्साही राहून काम करण्याची क्षमता वाढते.
nचेहऱ्यावर तेज निर्माण होऊन त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. 
nव्यायाम केल्याने दीर्घायुष्य लाभते.
nजेव्हा तुम्ही आराम करता, त्यावेळी चरबी विरघळण्याची क्षमता वाढते.  

घरच्या घरी व्यायाम 
nघरीच दोन डंबेल्स आणून व्यायाम करता येऊ शकतो. 
nजोर, बैठका 
आणि सूर्यनमस्कार 
करता येतात.
nयोग, पॉवर योग, एरोबिक डान्सिंग करता येते.

Web Title: So exercise must be done; told by celebrity fitness expert leena mogare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.