...म्हणून येतात पर्यटक; मेडिकल टुरिझम वाढले, स्वस्त उपचार करतात आकर्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:40 AM2022-12-12T09:40:48+5:302022-12-12T09:41:00+5:30
मेडिकल टुरिझममध्ये भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू व काेची ही शहरे आघाडीवर आहेत. आशिया, आखाती देश आणि आफ्रिकन देशांमधून माेठ्या संख्येने रुग्ण भारतात येतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील पर्यटन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरेच बदल झाले आहेत. काेराेना महामारीनंतर तर या क्षेत्राचा चेहराच पालटला आहे. परदेशी पाहुणे भारतात माैजमजा करणे, फिरणे किंवा सुट्ट्या घालवायला नव्हे तर स्वस्तात उपचार करून घेण्यासाठी येत असल्याचे समाेर आले आहे.
काेराेना महामारीमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट दिसून आली. २०२१मध्ये त्यात वाढ झाली आहे. मात्र, त्यांचे भारतात येण्यामागील कारण वेगळे आहे. पर्यटन मंत्रालयाची आकडेवारी पाहिल्यास ही बाब स्पष्ट हाेते. उपचारांसाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण तीनपटीहून जास्त नाेंदविण्यात आले आहे. भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या वयाकडे लक्ष टाकल्यास लक्षात येईल, की तरुणांची संख्या घटली आहे. ४५ पेक्षा जास्त वय असलेले नागरिक भारतात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
मेडिकल टुरिझममध्ये भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू व काेची ही शहरे आघाडीवर आहेत. आशिया, आखाती देश आणि आफ्रिकन देशांमधून माेठ्या संख्येने रुग्ण भारतात येतात.
भारतात स्वस्त उपचार
देशात हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी किमान ३-४ लाख रुपयांचा खर्च येताे. हाच खर्च परदेशात १२-१५ लाखांपर्यंत जाताे.
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही ५-९ लाखांचा खर्च येताे, तर परदेशात १५ ते २५ लाख रुपयांपर्यंत खर्च येताे.