बदाम भिजवूनच का खायला सांगितले जातात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:38 AM2023-08-14T10:38:17+5:302023-08-14T10:50:01+5:30

Almond Benefits : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बदाम खाणे तुमच्यासाठी फायेदशीर आहे. बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते. एका स्टडीनुसार, रोज एक मूठभर बदाम खाल्ल्याने तुम्ही काही दिवसातच बरंच वजन कमी करु शकता.

Soaked Almonds benefits : Why and how to consume almonds know the benefits and way of eating | बदाम भिजवूनच का खायला सांगितले जातात? जाणून घ्या कारण...

बदाम भिजवूनच का खायला सांगितले जातात? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Almond Benefits : हे सगळ्यांनाच माहीत आहे की, भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे होतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बदाम भिजवून खाण्याचे का सांगितले जाते? अनेकजण बदाम खातात पण याचा विचार कुणी करत नाही. चला जाणून घेऊया असे का सांगतात. 

बदामात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यात व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 अॅसिड असतं. या सर्व पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवणे चांगलं मानलं जातं.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बदाम खाणे तुमच्यासाठी फायेदशीर आहे. बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते. एका स्टडीनुसार, रोज एक मूठभर बदाम खाल्ल्याने तुम्ही काही दिवसातच बरंच वजन कमी करु शकता. यातील अॅंटी-ऑक्सीडेंट सुद्धा फायदेशीर आहे. भिजवलेल्या बदामात व्हिटॅमिन बी 17 आणि फोलिक अॅसिड असतं, जे कॅन्सरपासून सुरक्षा करतं. 

1. गर्भाची योग्य वाढ

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात. 

2. पचनशक्ती सुधारते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

3. रक्तदाबाची समस्या

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

4. हृदयाचं कार्य सुधारतं 

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

5. ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळी अवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढतात. 

6. वजन घटवण्यास मदत

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.
 

Web Title: Soaked Almonds benefits : Why and how to consume almonds know the benefits and way of eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.