नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:53 AM2020-02-18T10:53:20+5:302020-02-18T11:03:16+5:30
ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
खालेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर उरलेले अन्न मलावाटे शरीराच्या बाहेर टाकण्यात येतं. पण रोजची ही क्रिया करताना जर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही क्रिया करत असताना खूप दुखण्याचा त्रास होत असतो. ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनियमीत आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे तसंच मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. व्यायाम न केल्यामुळे मुळव्याधाची समस्या सगळ्यात जास्त जाणवत असते.
(image credit- medical news today)
मुळव्याधाच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मुळव्याधाची समस्या उद्भवल्यानंतर तुम्हाला फक्त मल बाहेर टाकतानाच नाही तर बसताना आणि उठताना सुद्धा त्रास होत असतो. गुदभागी भेगा, चिरा पडलेल्या असतात व त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात. यामध्ये वेदना तर असतातच, पण आगही खूप होते आणि मलाबरोबर रक्तही पडते.ही समस्या सहजासहजी कोणाला सांगता येण्यासारखी नसते. त्यासाठी आहारातून काही पदार्थ वगळून तुम्ही या समस्येपासूनस्वतःला दूर ठेवू शकता.
(image credit-.pristyncare.com)
लाल मिरचीचे सेवन करू नका
(image credit-amazon.in)
मुळव्याध असलेल्या लोकांना लाल मिरचीचे सेवन आहारातून वगळायला हवे. कारण त्यामुळे जळजळ जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून जास्त तिखट पदार्थ खाऊ नका.
बाहेरचं खाऊ नका
मुळव्याध झाल्यानंतर बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा कारण त्या पदार्थांध्ये मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही.
फायबर्सचा आहारात समावेश करा
(image credit-miachel kummar)
गरम पाणी, ताक, ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करा. जेणेकरून पोट साफ होण्यासाठी त्रास होणार नाही आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. ( हे पण वाचा-विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!)
मादक पदार्थाचे सेवन
अनेकांना सिगारेट, गुटखा आणि दारूचे अतिप्रमाणात सेवन करण्याची सवय असते. त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. त्यामुळे मुधव्याधाची समस्या वाढत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मादक पदार्थांचं सेवन करू नका. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)