सावधान! तरूण वयात केलेल्या 'या' चुका तुम्हाला आई होण्यापासून रोखू शकतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 06:07 PM2020-01-28T18:07:09+5:302020-01-28T18:18:06+5:30
१८ ते ३० वयात तुमची शारीरिक स्थिती आणि फर्टीलिटीची क्षमता खूपच सेंन्सिटीव्ह असते.
१८ ते ३० वयात तुमची शारीरिक स्थिती आणि फर्टीलिटीची क्षमता खूपच सेंन्सिटीव्ह असते. या वयात अनेक लहान मोठ्या चुका होत असतात. त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर आजारांचा सामना या चुकांमुळे करावा लागू शकतो. यामध्ये इन्फर्टिलीटीची समस्या सुद्धा उद्भवू शकते. तज्ञांच्यामते तरूण वयात केलेल्या चुकांमुळे हा त्रास होऊ शकतो.
रात्री उशिरापर्यंत जागणे
साधारणपणे सध्याच्या काळातील तरूण तरूणी रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करत जागत बसलेले असतात. सकाळी काहीजण झोपतात. ज्यामुळे त्यांची ८ तास पूर्ण झोप होत नाही. त्यामुळे कमी वेळ झोपत असलेल्या मुलींची फर्टीलिटी कमी होत असते. पिरीयड्स अनियमीत येणे, हार्मोनल बदलांचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या जाणवून फर्टिलीटी कमी होण्याचा धोका असतो. ( हे पण वाचा-तुमच्या 'या' सवयींमुळे होऊ शकता जीवघेण्या आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध)
खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयी
सध्याच्या तरूण मुलांमध्ये फास्ट फूड खाण्याचं प्रमाण अधिक दिसून येत असतं. प्रोसेस्ड फुड सुद्धा खाल्लं जातं. कारण तुम्ही संतुलित आहार न घेता जंकफूड जास्त प्रमाणात खात असाल तर फर्टिलिटीवर परिणाम होण्याता धोका असतो. यासाठी तुम्ही आहारात दूध, सोयाबीन, दही, पालक, गुळ , डाळिंब किंवा फळांचा समावेश करू शकता.
मादक पदार्थांचे सेवन
सिगारेट आणि मद्याच्या अतिसेवनामुळे अनेक मुलींची फर्टिलिटी कमी होत आहे. कारण मादक पदार्थांचा वाईट परिणाम लैगिंक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे तुमच्या किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम घ़डून येतो.
अति प्रमाणात व्यायाम
स्लीम ट्रिम दिसण्यासाठी मुली तरूण वयात अति व्यायाम आणि डाएटिंग करत असतात. याचा नकारात्मक परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र पुर्णपणे थांबण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात व्यायाम करा. ( हे पण वाचा-Corona Virus : म्हणून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना दिलं जातंय HIV चं औषध...)