सेल्फ इम्प्रुव्हमेंट करण्याच्या काही टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:33 PM2018-07-09T13:33:22+5:302018-07-09T13:54:00+5:30

स्वतःमधल्या काही वाईट सवयी दूर केल्या तर नक्कीच तुमचे व्यक्तिमत्व फुलू शकते. त्यामुळे सेल्फ इन्प्रुव्हमेंट ही एक महत्त्वाची बाब म्हणता येईल.

Some Tips for Self Improvement | सेल्फ इम्प्रुव्हमेंट करण्याच्या काही टिप्स

सेल्फ इम्प्रुव्हमेंट करण्याच्या काही टिप्स

googlenewsNext

एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं की माणसाला स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणता येते. असं म्हणतात की 18-25 या वयोगटात स्वतःमध्ये हवे तसे बदल घडवून आणले जाऊ शकते. स्वतःमधल्या काही वाईट सवयी दूर केल्या तर नक्कीच तुमचे व्यक्तिमत्व फुलू शकते. त्यामुळे सेल्फ इन्प्रुव्हमेंट ही एक महत्त्वाची बाब म्हणता येईल.

सेल्फइम्प्रुव्हमेंटकरण्याच्याकाहीटिप्स:

1) आयुष्यात तुम्हाला नेमकं काय करायचं हे निश्चित ठरवा. काही तरी करायचंय असं बोलून चालणार नाही. यासाठी पावलं उचलणंही गरजेचं आहे. सुरुवातीला छोटी पावलं टाका. वास्तववादी लक्ष्य ठरवा. छोट्या-छोट्या यशामुळे तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.

2) तुम्हाला आयुष्यात जर बरंच काही करायचं असेल. त्याची यादी खूप मोठी असेल तर त्याचं योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे, याची यादी करा. तुमचे प्राधान्यक्रम लिहून काढा. कधी काय करायचं आहे हे ठरवा.

3) एखादं यश मिळालं तर स्वत:चे कौतुक करा. स्वत:ला एखादी भेट द्या. आवडीची गोष्ट करा.

4) नेहमी पॉजिटिव्ह गोष्टींच्या सानिध्यात राहा. घरात सकारात्मक संदेश आणि पोस्टर्स लावा. प्रेरणादायी गोष्टींचा विचार करा. ही पोस्टर्स नियमितपणे बघा.

5) तुमची महत्त्वाची इव्हेंट आहे. त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पण लक्ष केंद्रित करणं अवघड जातंय. अशा वेळी इतरांची मदत घ्या. मदत घेतल्याने आपण लहान होणार नाही, हे लक्षात असू द्या.

6) इम्प्रुव्हमेण्ट ही केवळ व्यावसायिक किंवा करिअर किंवा शिक्षणाच्या स्तरावरच केली पाहिजे एवढय़ापुरते र्मयादित राहू नये. अगदी कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरही स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणणे या काळात सहज शक्य आहे.

7) आपल्या नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण करणे, कुटुंबियांची काळजी घेणे, त्यांना घरकामात मदत करणे, घरातील आपली भूमिका समजून घेणे, शेजार्‍यांशी सलोखा निर्माण करणे अशाही अनेक गोष्टी अंगिकारणे गरजेचे असते. सर्वांशी संबंध चांगलेच राहतील असाच आपला प्रयत्न असावा.

Web Title: Some Tips for Self Improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.