PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:05 PM2022-03-23T19:05:19+5:302022-03-23T19:16:51+5:30

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं.

sonam kapoor was diagnosed with pcos before pregnancy | PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Actress Sonam Kapoor) नुकतीच तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल बातमी दिली. इन्स्टाग्रामवर सोनम आणि तिच्या पतीने पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमने असंही सांगितले आहे की, माझी डिलिव्हरी (Sonam Kapoor preganncy) या वर्षी आहे आणि दोघेही नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, सोनम चार महिन्यांची गरोदर आहे आणि तिची प्रसूती ऑगस्टमध्ये होऊ शकते. याच कारणामुळे सोनम अनेक दिवस मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होती. आता सोनमने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाचा खुलासा केला आहे.

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं. तिच्या प्रमाणेच अनेक महिलांना पीसीओएस असू शकतो, यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या काही टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सोनमचा PCOS मधील आहार
सोनम कपूरने पीसीओएस असताना तिचा डाएट कसा होता, याची माहिती इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. तिनं सांगितलं होतं की, ती फक्त ताज्या आणि हंगामी गोष्टी खाते.

नाश्ता 
सोनमने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती कोकोनट योगर्टसोबत मूठभर बेरी खात आहे. एक वाटी हिरव्या भाज्या सोबत पुदिना किंवा ग्रीन टी घेतल्याने ती दिवसभर एनर्जी राहत असल्याचे तिनं सांगितलं. सोनमने भरपूर हिरव्या भाज्या खाल्ल्या आहेत आणि अनेक वैद्यकीय तज्ज्ञ पीसीओएसच्या बाबतीत हिरव्या भाज्या, फळे आणि ओमेगा -3 समृद्ध पदार्थ खाण्याची शिफारस करतात.

साखरेवर नियंत्रण
सोनमने PCOS बरा करण्यासाठी रिफाइंड शुगर पूर्णपणे बंद केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिच्या आरोग्यात खूप बदल झाला.

स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना नरुला यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना पीसीओएसचा त्रास आहे, त्यांनी सर्वप्रथम त्यांची हार्मोनल तपासणी करून घ्या आणि त्यांच्या शरीरात कोणते हार्मोन असंतुलन झाले आहे हे जाणून घ्या. चाचणीच्या अहवालानंतरच उपचार सुरू करता येतात.

डॉक्टर अर्चना सांगतात की, जर तुम्हाला पीसीओएस बरा करून गरोदर राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमची जीवनशैली बदला आणि तुमचे वजन जास्त असेल तर वजन कमी करा. याशिवाय तळलेले अन्न खाणं बंद करा. जेवणात भात, मैद्याचे पदार्थ खाणं बंद करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, धान्य आणि फळांचा समावेश करा. PCOS मध्ये गर्भधारणेसाठी डॉ. अर्चना आठवड्यातून किमान तीन किंवा चार वेळा अर्धा तास व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

Web Title: sonam kapoor was diagnosed with pcos before pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.