वजनदार अभिनेत्री भूमि पेडनेकरने दिल्या वजन कमी करण्याच्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:45 PM2019-03-04T12:45:00+5:302019-03-04T12:52:12+5:30

दम लगाके हईशा, टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान आणि आता 'सोनचिडिया'... आपल्या या बॉल्कबस्टर चित्रपटांमधून बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर सिम्पल आणि क्लासी लूकमध्ये दिसून आली.

Sonchiriya actress bhumi pednekar gives tips to lose weight | वजनदार अभिनेत्री भूमि पेडनेकरने दिल्या वजन कमी करण्याच्या टिप्स!

वजनदार अभिनेत्री भूमि पेडनेकरने दिल्या वजन कमी करण्याच्या टिप्स!

googlenewsNext

दम लगाके हईशा, टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान आणि आता 'सोनचिडिया'... आपल्या या बॉल्कबस्टर चित्रपटांमधून बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर सिम्पल आणि क्लासी लूकमध्ये दिसून आली. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या रील लाइफपेक्षा रिअल लाइफमध्ये भूमि फार ग्लॅमरस आहे. आपला पहिला वहिला चित्रपट 'दम लगाके हईशा'साठी 95 किलो वजन असणाऱ्या भूमिने कसं घटवलं वजन हा सर्वांच्या मनात असणारा कॉमन प्रश्न... एवढचं नाही तर आपली स्लिम-ट्रिम फिगर मेनटेन ठेवण्यासाठी भूमि नक्की काय-काय करते, जाणून घेऊया...

उपाशी राहून नाही तर आनंदी राहून कमी करा वजन

भूमि पेडनेकर नेहमीच सांगते की, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही स्वतःला मनापासून तयार करा. वजन कमी करण्यासाठी अनेक जण उपाशी राहतात. पण असं करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे असं न करता हेल्दी पर्याय वापरून, आनंदी राहून, योग्य डाएट आणि एक्सरसाइजचा आधार घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. 

एक टार्गेट निश्चित करा आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा

जर तुम्ही स्वतःशीच वेट लॉस करण्याचं टार्गेट निश्चित केलं तर तुम्हाला वजन कमी करण्सासाठी मदत होते. पण लक्षात ठेवा सुरुवातीला टार्गेट निश्चित करताना असं निश्चित करा जिथपर्यंत तुम्ही अगदी सहज पोहोचू शकता. उदाहरणार्थ एका आठवड्यामध्ये 5 किंवा 7 किलो वजन कमी करण्याचं टार्गेट ठेवण्याऐवजी तुम्ही एका आठवड्यामध्ये 1 किंवा 2 किलो वजन कमी करण्याचं टार्गेट ठेवू शकता. 

साखरेपासून दूर रहा

भूमिने सांगितले की, जेव्हा ती वेट लॉस डाएटवर होती त्यावेळी तिने तूप, बटर आणि ताक यांसारखे सर्व पदार्थांचा आहारात समावेश केला. पण फ्कत एकच पदार्थ जो तिने पूर्णपणे स्वतःपासून लांब ठेवला होता तो म्हणजे, साखर. साखरेचे सेवन केल्याने डाएट प्लॅनवर त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच तुम्हाला डायबिटीज होण्याचा धोका असतो. जर तुम्ही साखरेचे सेवन बंद केले तर तुमचं वजन कमी करण्याचं काम आणखी सोपं होतं. 

चीट मीलसुद्धा आवश्यक

भूमिच्या सांगण्यानुसार, आपल्या डाएट चार्टमध्ये चीट मिल्सचाही समावेश करणं आवश्यक असतं. आठवड्यातून एक दिवस डाएटपासून थोडंसं वेगळं म्हणून काही हलके-फुलके पदार्थ खाऊ सकता. यामुळे तुम्ही फूड क्रेविंग्स कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि तुमचे फेवरेट पदार्थ जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा ओवरइटिंगपासून बचाव करू शकता. 

घरीच तयार केलेले पदार्थ खा

जर तुम्ही खरचं वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर बाहेर मिळणारे पदार्थ आणि फास्टफूड यांसारखे पदार्थ खाणं टाळा. घरीच तयार करण्यात आलेल्या साध्या पदार्थांचा आहारात समावेश करा. असं केल्याने डाएटिशन आणि न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेण्याची गरज भासणार नाही. 

पाहा भूमिचे काही क्लासी फोटो :

 

Web Title: Sonchiriya actress bhumi pednekar gives tips to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.