ध्वनी तरंगांनी तोडले जाणार धमन्यांमधील ब्लॉकेज, संशोधकांनी तयार केलं नवं डिवाइस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 11:51 AM2019-02-26T11:51:12+5:302019-02-26T11:51:23+5:30
ब्लॉक झालेल्या धमन्यांचा उपचार आता ध्वनी तरंगांनी केला जाणार आहे. ब्रिटीश संशोधकांनी एक ट्यूबसारखी डिवाइस विकसित केली असून हे डिवाइस ध्वनी तरंग निर्माण करतं.
ब्लॉक झालेल्या धमन्यांचा उपचार आता ध्वनी तरंगांनी केला जाणार आहे. ब्रिटीश संशोधकांनी एक ट्यूबसारखी डिवाइस विकसित केली असून हे डिवाइस ध्वनी तरंग निर्माण करतं आणि धमन्यांमध्ये जमा झालेलं कॅल्शिअम तोडतं. याचं पहिल्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी ठरलं. तर दुसऱ्या टप्प्यात यूरोपच्या १५ केंद्रांतील १२० रुग्णांवर याचं परिक्षण सुरू आहे. संशोधकांनी याला कोरोनरी लिथोप्लास्टी सिस्टम असं नाव दिलं आहे.
बलूनच्या मदतीने ध्वनी तरंग रिलीज करतं डिवाइस
संशोधकांनुसार, रुग्णाला लोकल एनेस्थीसिया देऊन बलूनसोबत डिवाइस कॅथेटरच्या रूपात ब्लॉक झालेल्या धमन्यांपर्यंत पोहोचवलं जातं. ब्लॉकेजपर्यंत पोहोचल्यावर बलून फुगतो आणि सलाइन सॉल्यूशन रिलीज करतं. अशा स्थितीमध्ये डिवाइस अॅक्टिव होतो आणि बलूनच्या मदतीने ध्वनी तरंग रिलीज करू लागते. या तरंग कॅल्शिअमच्या ब्लॉकेजला हळूहळू तोडतात.
JACC जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, या डिवाइसच्या मदतीने ३० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ९० टक्के प्रकरणं यशस्वी ठरलीत. वर्तमानात दुसरा ट्रायल ऑक्सफोर्डच्या जॉन रेडक्लिफ हॉस्पिटल आणि लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये केलं जात आहे.
संशोधकांनुसार, ज्यास्तीत जास्त हृदयरोगांचं कारण ब्लॉकेमुळे धमन्या क्षतीग्रस्त होतात. त्यामुळे याने हृदयचा रक्तसंचार बाधित होतो. तसेच छातीत दुखणे, धमन्यांमध्ये डॅमेज होणे, ब्लड क्लॉट आणि हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात. सर्जरीसाठी स्टेंट किंवा बलूनचा प्रयोग केला जाऊ शकतो. पण प्रत्येक केसमध्ये असं करण धोकादायक ठरू शकतं.
संशोधकांचं म्हणणं आहे की, अनेक रुग्णांमध्ये कॅल्शिअम फार जास्त जमा होतं. अशात रुग्णातील कॅल्शिअम सहजपणे तोडता येत नाही आणि बलूनही फुगत नाही. तसेच धमन्यांमध्ये डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो आहे. पण शॉकवेव टेक्नॉलॉजीने याचा उपचार शक्य होतो.