स्पेन जगातील सर्वात हेल्दी देश; तर भारत, श्रीलंका आणि नेपाळ अनहेल्दी देश!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 01:15 PM2019-02-26T13:15:56+5:302019-02-26T13:17:04+5:30
जगभरातील सर्वात निरोगी देशांच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर स्पेन असून दुसऱ्या क्रमांकावर इटलीची वर्णी लागली आहे. संपूर्ण जगभरातील जवळपास 169 देशांचे आरोग्यासंबंधी मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनांच्या आधारे हे क्रमांक देण्यात आले आहेत.
जगभरातील सर्वात निरोगी देशांच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर स्पेन असून दुसऱ्या क्रमांकावर इटलीची वर्णी लागली आहे. संपूर्ण जगभरातील जवळपास 169 देशांचे आरोग्यासंबंधी मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनांच्या आधारे हे क्रमांक देण्यात आले आहेत. दक्षिण आशिआई देशांबाबत सांगायचे झालेच तर, भारताचा क्रमांक मागील वर्षापेक्षा एका स्थानाने घटला आहे. 2017मध्ये भारत 119व्या क्रमांकावर होता आणि 2018च्या मूल्यांकनानुसार भारत 120व्या क्रमांकावर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आरोग्याच्या बाबतीत भारताची रॅकिंग श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळ यांच्यापेक्षाही मागे आहे. या यादिमध्ये श्रीलंका 66व्या क्रमांकावर तर बांग्लादेश 91व्या क्रमांकावर असून नेपाळचा 110वा क्रमांक लागतो.
चीन 52व्या क्रमांकावर
भारताचा शेजारी असणारा चीनही रॅकिंगच्या बाबतीत अव्वल आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत चीनमधील लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून आली आहे. 2017मध्ये चीन 55व्या क्रमांकावर होता, तेच 2018च्या मूल्यांकनानुसार, चीन 52व्या क्रमांकावर पोहचला आहे. ब्लूमबर्ग हेल्दिएस्ट कंट्री इंडेक्सच्या 2019च्या एडिशननुसार, जगभरातील 169 देशांना यामध्ये सहभागी करण्यात आले होते. यामध्ये अनेक फॅक्टर्सना लक्षात घेऊन देशांची रॅकिंग करण्यात आली होती. ज्यामध्ये देशातील लोकसंख्येच्या ओवरऑल आरोग्याव्यतिरिक्त संसर्गजन्य आणि गैर-संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यू आणि अनुमानित जीवनकाळ यांसारख्या गोष्टींचा समावेश केला होता.
आरोग्यावर सर्वात जास्त खर्च करणारा देश अमेरिका
आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रति व्यक्ती 11 हजार डॉलर खर्च करणारा अमेरिका हा आरोग्यावर सर्वात जास्त खर्च करणारा देश आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेची रॅकिंग 34 आहे आणि मागील 3 वर्षांपासून सतत तेथील लोकांचा अनुमानित जीवन काळ घटत आहे. तेच इंग्लंडबाबत सांगायचं तर येथे प्रति व्यक्ती आरोग्याचा खर्च 4 हजार डॉलर आहे आणि इंग्लंडची रॅकिंग 2018मध्ये 19 असून 2017मध्ये 23 होती. ज्या देशांनी या लिस्टमध्ये सर्वात उत्तम प्रदर्शन केलं होतं. या देशांमध्ये लोकांच्या आरोग्यासाठी 70 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च तेथील सरकार करतं. यामध्ये आइसलँन्ड, जपान, स्वित्झर्लन्ड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि नॉर्वे यांसारख्या देशांचा समावेश आहे. ज्यांचा क्रमांक या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये लागतो.
भारतामध्ये प्रति व्यक्ती खर्च फक्त 240 डॉलर
स्पेन आणि इटली यांसारखे देश जे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हे दोन्ही देश हेल्थकेअरवर प्रति व्यक्ती 3500 डॉलर खर्च करतात. तेच भारताबाबत सांगायचे तर येथे हेल्थकेअरवर करण्यात येणारा प्रति व्यक्ती खर्च 240 डॉलर आहेत. यापैकी अनेक लोक स्वतः खर्च करतात. त्यांना सरकारकडून फार कमी सपोर्ट मिळतो. जगभरातील 30पेक्षा जास्त अनहेल्दी देशांमध्ये 27 आफ्रिकी देशांचा समावेश होतो आणि याव्यतिरिक्त हैती, अफगानिस्तान आणि यमन हे देशही समाविष्ट आहेत.