Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:15 AM2019-10-10T11:15:24+5:302019-10-10T11:17:48+5:30
स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट शूजनंतर आता बाजारात स्मार्ट शर्टही आलं आहे. स्पेनची कंपनी 'सेपिया' एक स्मार्ट शर्ट बाजारात घेऊन आली आहे.
(Image Credit : afro105fm.com)
स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट शूजनंतर आता बाजारात स्मार्ट शर्टही आलं आहे. स्पेनची कंपनी 'सेपिया' एक स्मार्ट शर्ट बाजारात घेऊन आली आहे. हे शर्ट घालून तुम्ही तुमचं स्ट्रेल लेव्हल कमी करू शकता. इतकेच नाही तर या शर्टमध्ये आणखीही काही खास गोष्टी आहेत. हे शर्ट रक्तप्रवाह संतुलित करण्यासोबतच ऊर्जेचा स्तरही वाढवतं, असा कंपनीने दावा केला आहे.
सेपिया कंपनी केल्या काही वर्षांपासून स्मार्ट शर्टच्या कॉन्सेप्टवर काम करत आहे. हे शर्ट नुकतंच लॉन्च करण्यात आलं असून हे थर्ड जनरेशन आहे. म्हणजे याआधी असे दोन स्मार्ट शर्ट आले आहेत. पहिल्या जनरेशनच्या शर्टमध्ये कंपनीने अशा फॅब्रिकचा वापर केला होता की, ज्यात कॉलर आणि दुसरे भाग घाण होऊ नयेत. तर दुसऱ्या जनरेशनच्या शर्टमध्ये घामाचे डाग पडत नाही आणि दुर्गंधीही येत नाही.
कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी एक खासप्रकारचं फॅब्रिक तयार केलं आहे. जे लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. असे सांगितले जाते की, हे फॅब्रिक तयार करण्यासाठी त्यात बायोसेरामिक नॅनोपार्टिकल्स सुद्धा टाकण्यात आले आहेत. असा दावा केला जातो आहे की, हे शर्य सूर्यकिरणांपासूनही बचाव करतं. तसेच याने शरीराला चांगलं ऑक्सिजनही मिळतं.
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर
सेपियाचं हे स्मार्ट शर्ट ३.० मेटाबॉलिज्म वाढवण्यास फायदेशीर आहे. कंपनीचे सीईओ फेड्रिको सेंज सांगतात की, 'आधी आम्ही अशा कपड्यांपासून सुरूवात केली, जे आरामदायी होते. पण आमचं लक्ष्य फॅशनसोबतच आरोग्य आणि स्थिरता वाढवणे हे आहे'.
किती आहे शर्टची किंमत?
या शर्टची किंमत सध्या ९८ डॉलर ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत ६९०० रूपये इतकी होते. कंपनीने सांगितले की, त्यांचे शर्ट इतर शर्टच्या तुलनेत दुप्पट जास्त काळ चालतील.