स्वत:साठी काढा वेळ, नाहीतर तुमची कार्यक्षमता होईल कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:26 PM2017-10-31T17:26:22+5:302017-10-31T17:27:11+5:30
दिवसातली किमान काही मिनिटं तरी स्वत:साठी राखून ठेवा, जी फक्त तुमची स्वत:चीच आणि स्वत:साठी असतील..
- मयूर पठाडे
आपला रोजचा दिवस कसा जातो? सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करतो? कुठल्या गोष्टींत आपला किती वेळ जातो? थोडंसं आपण आपल्याच शेड्यूलकडे पाहिलं तर बºयाच तरुणांच्या, लोकांच्या आयुष्यात पुरेसा वेळच नसतो. त्यांची मुख्य तक्रार तीच असते, की वेळच पुरत नाही.. आहे त्या गोष्टी करता करताच इतका जिव जातो की इतर काही करण्यासाठी काही वेळच पुरत नाही. रात्री झोपायच्या वेळेला तर अंगातलं त्राण जवळपास नाहीसंच झालेलं असतं. फक्त तरुणच नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात सध्या हीच स्थिती आहे. एकामागे एक कामांचा आणि जबाबादºयांचा नुसता भडिमार. बरं या जबाबदाºया टाळूनही चालत नाही..
का होतं असं?
खरंच यांना वेळ होत नाही, वेळ नाही किंवा वेळेचं व्यवस्थापन त्यांना करता येत नाही?.. वेळेचं व्यवस्थापन तर करायलाच हवं, पण वेळ नसतो हेही खरं, कारण आजकाल प्रत्येकालाच अनेक आघाड्यांवर, तेही एकाच वेळी लढावं लागतं, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीशी लढण्यापेक्षा वेळेशी लढण्यातच त्यांची खूप शक्ती वाया जाते आणि आपल्य हाती वेळच नसल्याचं एक अनामिक टेन्शनही त्यांच्या मानगुटीवर सातत्यानं बसलेलं असतं. वेळ जसजसा पुढे सरकत जातो आणि करायच्या गोष्टींची यादी वाढत जाते, तसतसं अनेकांची अस्वस्थता वाढत जाते. नेमक्या याच गोष्टीय अभ्यसकांनी बोट ठेवलं आहे.
अभ्यासकांचं म्हणणं आहे, आपलं शेड्यूल बिझी असण्यात आता तसं काही नवीन नाही, किंबहुना ती आता आपली अपरिहार्य अशी गरज आहे, पण इतक्या साºया जबाबदाºया अंगावर घेताना त्याला काही प्रायॉरिटी, प्राधान्यक्रम निश्चितच असला पाहिजे. कमी महत्त्वाच्या जबाबदाºया नंतर करायच्या असं ठरवून काही वेळ तुमच्यासाठी तुम्ही मोकळा ठेवलाच पाहिजे.
असा मोकळा वेळ जर तुमच्याकडे नसला तर तुमची कार्यक्षमता तर कमी होतेच, पण तुमचं आयुष्यही कमी होतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत नुकताच त्यासंदर्भातील अभ्यास करण्यात आला. त्यामुळे आपल्या वेळेचं नियोजन करा आणि दिवसातली किमान काही मिनिटं तरी केवळ आपल्यासाठी राखून ठेवा. जी वेळ फक्त तुमची आणि तुमचीच असेल...