अभ्यास सांगतोय रोज 10 मीनिटं ध्यानधारणा करा आणि 5 त्रासापासून मुक्त राहा!

By Admin | Published: May 6, 2017 04:44 PM2017-05-06T16:44:56+5:302017-05-06T16:44:56+5:30

तुम्ही व्यायामासाठी भलेही तासभर नाही काढू शकलात तर किमान दहा मीनिटं काढाच. आणि या दहा मीनिटात एका जागी शांत बसून ध्यानधारणा करा. कारण दहा मीनिटाच्या ध्यानधारणेने 5 महत्त्वाचे त्रास कमी होतात

Speaking of study, meditate every 10 minutes everyday and stay free from the 5 stress! | अभ्यास सांगतोय रोज 10 मीनिटं ध्यानधारणा करा आणि 5 त्रासापासून मुक्त राहा!

अभ्यास सांगतोय रोज 10 मीनिटं ध्यानधारणा करा आणि 5 त्रासापासून मुक्त राहा!

googlenewsNext



रोज अमूक ढमूक मीनिटं व्यायाम करा, तमूक किलोमीटर चाला. तुमच्या इतक्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे वगैरे वगैरे.. पण या गोष्टी स्वत:ला जोडायला गेलो तर प्रत्येकाच्याच तोंडी एकच वाक्य, ‘अहो रोजच्या रामरगाड्यात आहे कोणाला इतका वेळ?’ ‘स्वत:साठी 24 तासातले 5 मीनिटं काढणं अवघड तिथे तासाभराचा व्यायाम झेपेल कोणाला?’
व्यायाम टाळण्याच्या सबब सांगितल्या की व्यायाम न करणारे मोकळे होतात. पण आता देशा परदेशातला आरोग्यविषयक अभ्यास सांगतोय की तुम्ही व्यायामासाठी भलेही तासभर नाही काढू शकलात तर किमान दहा मीनिटं काढाच. आणि या दहा मीनिटात एका जागी शांत बसून ध्यानधारणा करा. कारण दहा मीनिटाच्या ध्यानधारणेने 5 महत्त्वाचे त्रास जे कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच छळतात त्या त्रासापासून आपण कायमचं मुक्त होवू शकतो. 10 मीनिटाची ध्यानधारणा केवळ 5 त्रासांवरचा इलाज नसून आनंदी आणि निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली आहे. याविषयावर अभ्यास आणि संशोधन करणारे अभ्यासक आणि संशोधक रेटून सांगता आहेत की, आता वाट पाहू नका स्वत:साठी रोज फक्त दहा मीनिटं काढा आणि ध्यानधारणा करा!

 

Web Title: Speaking of study, meditate every 10 minutes everyday and stay free from the 5 stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.