तुम्हाला माहिती आहेत का झोपेबद्दलचे हे लोकप्रिय गैरसमज?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:51 AM2021-12-17T08:51:25+5:302021-12-17T08:51:46+5:30

झोपेबाबत अनेकांच्या मनात काही ना काही समज गैरसमज असतात.

special article on Do you know these popular misconceptions about sleep | तुम्हाला माहिती आहेत का झोपेबद्दलचे हे लोकप्रिय गैरसमज?

तुम्हाला माहिती आहेत का झोपेबद्दलचे हे लोकप्रिय गैरसमज?

Next

१) झोप लागत नसली तर, तुमच्या शरीराला हळूहळू त्याची सवय होते : हे चूक आहे. अशी सवय होणे शक्य नसते आणि ते अनारोग्यकारकही आहे.

२) मोठ्या माणसांना चारएक तासाची झोप पुरेशी असते हा समज साफ चुकीचा आहे. लहान मुलांना झोपेची अधिक गरज असते आणि वय वाढत जाते तशी टी कमी कमी होत जाते हे खरे आहे, तरीही प्रौढ वयातल्या माणसालाही - सात ते नऊ तासांची झोप ही अत्यावश्यक आहे.  

३) तुम्ही कोणत्या वेळी झोपता हे महत्त्वाचे नाही, पुरेशी झोप मिळाली की झाले !- असे  केल्यास शरीराच्या नैसर्गिक चक्रात बिघाड उत्पन्न होतो. 

४) गाढ झोपेत तुमच्या मेंदूचे काम पूर्ण थांबलेले असते.- बिलकूल नाही. उलट रात्री तुम्ही झोपेत असताना मेंदू अत्यंत महत्त्वाची कामे मार्गी लावण्याच्या घाईत असतो. 

५) जितके जास्त झोपाल , तेवढे तब्येतीला चांगलेच  - गोड  गैरसमज ! जरुरीपेक्षा जास्त झोपेची गरज हे अनारोग्याचे लक्षण आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त झोप येत असेल, जातायेता सतत डुलकी काढावीशी वाटत असेल तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यायला हवा. 

६) तुम्ही घोरत असाल तर, फार काही बिघडत नाही - घोरणे  ही सवय नसून तो एक विकार आहे. गरजेनुसार त्यासाठी वैद्यकीय सल्ला , उपचार  आवश्यक आहे. 

७) कुठेही कोणत्याही वेळी पटकन झोप लागते अशी माणसे  खरोखर भाग्यवान ! - हे पुरेशी झोप मिळत नसल्याचे  लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये 

८) रात्री नीट झोप होत नसेल तर,  दिवसा डुलक्या  स्वाभाविकच - चूक !

९) झोप येत नसेल तर,  दामटून अंथरुणातच पडून राहा. कधीतरी कंटाळून झोप येतेच !- अशावेळी अंथरुणात पडून राहण्यापेक्षा उठा. मन शांत होईल असे उपाय जरूर करा, त्याचा अधिक उपयोग होईल. 

१०) चांगला प्रकाश असलेल्या खोलीत झोप लागत असेल तर, त्यात काय वाईट आहे ?- असे  करून तुम्ही तुमच्या शरीरावर अन्याय कराल !

११) ड्रायव्हिंग  करताना झोप येत असेल तर,  गाडीत म्युझिक लावा, खिडक्या उघडा .. आपोआप झोप पळून जाईल .- हे धोकादायक आहे. ड्रायव्हिंग करताना पुरेशी झोप झालेली नसेल तर, एकच पर्याय आहे : गाडी थांबवा आणि स्टिअरिंग दुसऱ्याच्या हाती द्या !

Web Title: special article on Do you know these popular misconceptions about sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य