रात्री फोनवर तासन्तास वेळ घालवताय? ही ठरु शकते तुमच्यासाठी धोक्याची घंटा....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:49 PM2021-05-15T18:49:19+5:302021-05-15T18:50:22+5:30
रात्री मोबाईल वापरणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्याला होणारे अनेक आजार आपल्या या सवयीमुळे असू शकतात.
आपल्यापैकी जवळजवळ सर्वचजण रात्रभर मोबाईलवर वेळ घालवता. याबद्दलचे अनेक मीम्सही आपण सोशल मिडियावर पाहतो. पण मित्रांनो ही काही हसण्यावर नेण्याची गोष्ट नाही. रात्री मोबाईल वापरणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्याला होणारे अनेक आजार आपल्या या सवयीमुळे असू शकतात. रात्री सर्वात जास्त वेळ फोनवर घालवल्याने आपल्या झोपेवर कमालीचा परीणाम होतो. रात्री फोन पाहण्याची सवय ही झोपेची दुश्मन आहे असेही आपण म्हणू शकतो. रात्री झोप नीट आल्याने आपल्या शरीराव त्याचे वाईट परिणाम होतात ते वेगळे.
नुकतंच यावर एक संशोधन झालं ज्यात रात्री मोबाईलवर तासन् तास वेळ घालवण्याचे झोपेवर होणारे दृष्परीणाम समोर आले.
डीडब्लुओने दोन बहिणींवर याबाबतीत संशोधन केले. त्यात एक बहिण रोज रात्री मोबाईलवर तासन् तास वेळ घालवायची. तर दुसरी रोज रात्री झोपण्यापुर्वी पुस्तक वाचायची. दोघींवर केलेल्या संशोधनाअंती असे समोर आले की जी बहिण मोबाईलवर खेळायची तिची रात्रीची झोप अपूर्ण व्हायची. तीच जी बहिण पुस्तक वाचायची तिची रात्रीची झोप पूर्ण व्हायची. या अहवालावर बोलताना तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की मोबाईलची किरणांमधील तरंग फार छोटे असतात. जेव्हा ही डोळ्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्या शरीरातील हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रोजच्या झोपण्याच्या काळामध्ये अडथळा येऊ शकतो व झोप कमी होते.
तसंच हे संशोधन करताना दोन्ही बहिणी एकाच वातावरणात, एकाच घरात राहत होत्या. दोघी कामही सारखंच करायच्या. या दोघींच्या झोपेतील फरक १५ मिनिटे उशीरा इतका होता. इतकंच नाही तर त्यांची लक्ष केंद्रित करण्याची चाचणीही समोर आली आणि यात रात्री मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या बहिणेचा रिझल्ट अत्यंत वाईट होता.
रात्री नीट झोप न आल्याने काय होते?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार रात्री झोप न आल्याने शारीरीक तसेच मानसिक धोके उद्भवतात. तुमच्या लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. यावर एक छोटासा उपाय म्हणजे आपल्या फोनचा प्रकाश तुम्ही कमी करू शकता. तसेच निळ्या प्रकाशाऐवजी सेटिंग्समध्ये जाऊन लाल प्रकाश केल्याने झोपेवर थोडा कमी प्रमाणात प्रभाव पडतो.