टाइट बेल्ट बांधण्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच सवय सोडा नाही तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 11:15 AM2019-01-16T11:15:01+5:302019-01-16T11:15:04+5:30

अनेकांना कंबरेवर टाइट बेल्ट बांधण्याची सवय असते. या सवयीने भलेही तुमची पॅंट खाली घसरत नसेल पण तुमचं आरोग्य मात्र गंभीररित्या ढासळतं.

Sperm count decreases if you tie your belt too tight | टाइट बेल्ट बांधण्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच सवय सोडा नाही तर पडेल महागात!

टाइट बेल्ट बांधण्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच सवय सोडा नाही तर पडेल महागात!

googlenewsNext

अनेकांना कंबरेवर टाइट बेल्ट बांधण्याची सवय असते. या सवयीने भलेही तुमची पॅंट खाली घसरत नसेल पण तुमचं आरोग्य मात्र गंभीररित्या ढासळतं. घट्ट बेल्ट बांधण्याची ही सवय केवळ शरीरासाठी हानिकारक नाही तर जीवघेणीही ठरु शकते. याने पोटांचे आजार होण्याचा धोका तर असतोच पण घशाचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो. जर तुम्हीही अशाप्रकारे टाइट बेल्ट बांधत असाल तर ही सवय वेळीच मोडा. ही सवय न सोडल्यास काय गंभीर परिणाम होतात हे पाहुयात....

मणक्यामध्ये त्रास

ही सवय जर तुम्हाला फार पूर्वीपासून असेल तर तुम्हाला मणक्यामध्ये समस्या होऊ शकते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये बदल होत असल्याने गुडघ्यांच्या जॉईंट्सवरही प्रमाणापेक्षा जास्त प्रभाव पडतो. ज्यामुळे गुडडेदुखीची समस्या डोकं वर काढते. 

पोटाच्या नसा दबतात

एका कोरियन संशोधनात असं समोर आलं की, कंबरेवर टाइट बेल्ट बांधल्याने अब्डॉमिनल मसल्स म्हणजे पोटाच्या मांसपेशींची काम करण्याची पद्धत बदलते. दिवसभर पोटाच्या नसा दबलेल्या असतात. असे नेहमी केल्याने वेन्स, मसल्स आणि आतड्यांवर प्रेशर पडतो. 

इन्फर्टिलिटीचा धोका

दिवसभर टाइट बेल्ट बांधून ठेवल्याने पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटची कमतरता येऊ शकते. ज्यामुळे पुरुषांची फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमात घटण्याची शक्यता वाढते. 

घशाचा कॅन्सर

एका शोधानुसार, जे व्यक्ती जास्त जाड असतात आणि बेल्ट जास्त टाइट बांधतात, त्यांच्या अन्ननलिकेवर जास्त दबाव पडू लागतो. अशात अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अ‍ॅसिड रिफ्लक्स समस्येमुळे पोटात तयार होणारं अ‍ॅसिड वरच्या दिशेने जातं. या अ‍ॅसिडमुळे गळ्यातील पेशी नष्ट होतात, नंतर या पेशी नष्ट होऊन कॅन्सरचं रुप घेतात.

Web Title: Sperm count decreases if you tie your belt too tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.