पालक उकडून पाणी फेकण्याची करू नका चूक, या पाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:39 AM2024-02-23T10:39:33+5:302024-02-23T10:40:17+5:30

Spinach water benefits : जास्तीत जास्त लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं.

Spinach Water Benefits : Control BP, improve eye, skin and hair healthy you should know | पालक उकडून पाणी फेकण्याची करू नका चूक, या पाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

पालक उकडून पाणी फेकण्याची करू नका चूक, या पाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

Spinach water benefits : पालेभाज्या खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. पालेभाज्यांनी आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अनेक आजरांना दूर करण्यास यांनी मदत मिळते. पालेभाज्यांमध्ये सगळ्यात महत्वाची भाजी पालक मानली जाते. पालकाची डाळभाजी लोक आवडीने खातात. लोक आधी पालक उकडतात आणि मग तिची भाजी करतात.

जास्तीत जास्त लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं. त्यात आरोग्याला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात. आज तेच जाणून घेऊ.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पालकाचं गरम पाणी डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं. या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी थेट फायदेशीर असतं. त्यासोबतच त्यात ल्यूटिन आणि जेक्साथिनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे डोळ्यांच्या कोशिका मजबूत करतात.

त्वचे ताजीतवाणी होते

पालक उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या दूर होते. तसेच त्वचा चमकदार होते. इतकंच नाही तर या पाण्याच्या सेवनाने शरीरातील ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.

इम्यूनिटी वाढते

पालकाच्या गरम पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीनसहीत अनेक पोषक तत्व असतात. ज्याचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो.

केस होतात मजबूत

पालकाचं गरम पाणी पायल्याने डोक्यावर केसांना फार फायदा होतो. त्यात प्रोटीन आणि आयरन असतं. ज्याने केसांचं मूळ मजबूत होतं आणि ते पांढरे होण्याचा स्पीडही कमी होतो.

पोट चांगलं राहतं

ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असण्याची समस्या असते, त्यांच्यासाटी पालकाचं पाणी फार फायदेशीर असतं. याच्यामुळे त्यांचं मेटाबॉल्जिम वाढतं, ज्यामुळे पोटाचं पचन तंत्र योग्यपणे काम करतं. हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

कसं कराल सेवन?

पालक उकडल्यानंतर त्याची पाने बाहेर काढा. शिल्लक राहिलेलं पाणी गाळून एका ग्लासमध्ये टाका. नंतर त्यातं काळं किंवा पांढरं मीठ टाका आणि नंतर हे पाणी चहासारखं एक एक घोट प्यावं.

Web Title: Spinach Water Benefits : Control BP, improve eye, skin and hair healthy you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.