शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल लगेच बाहेर काढेल ही भाजी, फायदे वाचून आजच सुरू कराल सेवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 01:39 PM2023-09-20T13:39:49+5:302023-09-20T13:40:33+5:30
Kantola Vegetable Benefits : आज आम्ही तुम्हाला औषधं न घेतो कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी एका भाजीबाबत सांगणार आहोत.
Kantola Vegetable Benefits : शरीरात रक्तप्रवाह योग्यपणे होण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉल बनत राहतं. हा एक मेणासारखा पदार्थ असतो. जो रक्तवाहिन्यांना आतून मुलायम ठेवतो. पण जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढलं तर रक्तप्रवाहात समस्या होते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला औषधं न घेतो कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी एका भाजीबाबत सांगणार आहोत. या भाजीच्या सेवनाने तुम्ही फिटही रहाल आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होईल.
अनेक दृष्टीने फायद्याची भाजी
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या या भाजीचं नाव आहे करटूले. वेगवेगळ्या ठिकाणी या भाजीला वेगवेगळी नावे आहेत. या भाजीवर वरून काटे असतात. जे साफ करून ही भाजी तयार केली जाते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल विष्ठेसोबत बाहेर काढतं.
करटूल्याच्या भाजीचे फायदे
कॅन्सरपासून होतो बचाव
मीडिया रिपोर्टनुसार, करटूल्याच्या भाजीमध्ये अनेक खास तत्व असतात. जे शरीरात जाऊन अॅंटी-कॅन्सर तत्वांच्या रूपात काम करतात. दावा असाही केला जातो की, करटूल्याची भाजी नियमित खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.
ब्लड प्रेशर राहील कंट्रोल
ज्या लोकांना हायपरटेंशन किंवा हाय बीपीची समस्या आहे, त्यांनी करटुल्याच्या भाजीचं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. कारण या भाजीमध्ये हाय ब्लड प्रेशर कमी करण्याचे गुण आढळतात. या भाजीचा ज्यूस प्यायल्याने हायपरटेंशनमध्ये आराम मिळतो.
वजन होतं कमी
ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांच्यासाठी करटूल्याची भाजी रामबाण उपाय मानली जाते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं सोबतच कॅलरीचं प्रमाण कमी असतं. ही भाजी खाल्ल्याने पोट लवकर भरतं, ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता.