कोंब आलेले बटाटे खाताय तर सावधच राहा, याचे दुष्परिणाम आहेत भयंकर- संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:39 PM2022-01-19T14:39:38+5:302022-01-19T14:42:32+5:30

बटाट्यांना मोड यायला सुरूवात होते. परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याचे मोड काढून त्याचा भाजीमध्ये वापरतात. परंतु असं करणं योग्य आहे का? किंवा याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होईल याचा आपण कधी विचार देखील करत नाही.

sprouted potatoes are dangerous for your health | कोंब आलेले बटाटे खाताय तर सावधच राहा, याचे दुष्परिणाम आहेत भयंकर- संशोधन

कोंब आलेले बटाटे खाताय तर सावधच राहा, याचे दुष्परिणाम आहेत भयंकर- संशोधन

Next

बटाटा ही घरातील अशी भाजी आहे. ज्याचा वापर जवळ-जवळ प्रत्येक भाजीमध्ये केला जातो. तसेच याची वेगळी भाजी देखील बनवली जाते. बहुतांश घरांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी केले जातात. परिणामी, काही दिवसांनी त्यात उगवण सुरू होते. म्हणजेच, त्या बटाट्यांना मोड यायला सुरूवात होते. परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याचे मोड काढून त्याचा भाजीमध्ये वापरतात. परंतु असं करणं योग्य आहे का? किंवा याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होईल याचा आपण कधी विचार देखील करत नाही.

अंकुरलेले बटाटे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की हानिकारक आहेत?
नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरचे म्हणणे आहे की, जर तुमच्या घरात ठेवलेल्या बटाट्यांना अंकुर फुटू लागले असतील तर ते फेकून देणे हा एक उत्तम पर्याय आहे. असे बटाटे आरोग्यासाठी चांगले नाहीत. अंकुरित बटाटा आरोग्यासाठी हानिकारक का आहे, त्याचा परिणाम कसा समजून घ्यावा आणि तो किती धोकादायक आहे? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे

यामुळे बटाटा विषारी होतो
नॅशनल कॅपिटल पॉइझन सेंटरच्या अहवालानुसार, बटाट्यामध्ये नैसर्गिकरीत्या सोलानाईन आणि चाकोनाईनसारखे काही विषारी पदार्थ असतात. जरी, ते त्यात फार कमी प्रमाणात आढळतात, परंतु ते बटाटाच्या वनस्पती आणि पानांमध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळे बटाट्याला जसे अंकुर फुटू लागते, त्याचप्रमाणे त्यामध्ये दोन्ही विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे असे बटाटे कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यानंतर ते घटक शरीरात पोहोचून आपल्या शरीराला हानि पोहचवू लागतात.

अहवालात असे म्हटले आहे की, असे बटाटे एकदा किंवा दोनदा खाल्ल्याने फारसे नुकसान होत नाही, परंतु जर तुम्ही अशा बटाट्यापासून बनवलेले अन्न सतत खात असाल तर अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषत: यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

अशी लक्षणे दिसू शकतात
रिपोर्टनुसार, जर बटाट्यातील विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात पोहोचू लागले तर अनेक लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ, उलट्या, जुलाब आणि पोटदुखी इ. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे सौम्य असू शकतात तर काहींमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

स्थिती अधिक गंभीर झाल्यास, कमी रक्तदाब, ताप आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. हे वेळीच थांबवले नाही तर मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे सतर्क रहा.

बटाट्याला अंकुर फुटण्यापासून कसे रोखायचे?
जर बटाट्याला हिरवा रंग दिसत असेल किंवा आधीच कुठेतरी अंकुर फुटला असेल तर तो काढून टाका. बटाटे अशा ठिकाणी ठेवा जेथे सूर्याची किरणे पोहोचत नाहीत किंवा ते खूप थंड ठिकाण नाही.ते साठवताना नेहमी कांद्यासारख्या भाज्यांपासून   वेगळे ठेवा कारण ते गॅस सोडतात ज्यामुळे बटाट्यांमध्ये उगवण सुरू होते. म्हणजेच जर तुम्ही कांदे-बटाटे एकत्र ठेवत असाल, तर असे करु नका.

जर तुम्ही बटाटे मोठ्या प्रमाणात विकत घेतले असतील तर तुम्ही ते सुती पिशवीत ठेवू शकता. पिशवी अशी असावी की त्यातून हवा जाऊ शकेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही तो अंकुर फुटलेला बटाटा बागेत लावल्यास बटाट्याची रोपे वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही तसा बटाटा खाऊ शकता.

Web Title: sprouted potatoes are dangerous for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.